• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • आठ नव्या कारची मॉडेल्स लॉन्च

आठ नव्या कारची मॉडेल्स लॉन्च

29 जानेवारी नवी दिल्ली स्वाती खंडेलवाल गेल्यावर्षी विक्रीची आकडेवारी घसरल्यामुळे ऑटो इंडस्ट्री चिंतेत आहे. तरीही नव्या वर्षात अनेक कंपन्या त्यांची नवी मॉडेल्स मार्केटमध्ये आणण्याचं धारिष्ट्य दाखवत आहेत. जानेवारीतच आठ नवी कारची मॉडेल्स लॉन्च झाली आहेत.ऑटो इंडस्ट्रीमधल्या कंपन्यांनी नवीन वर्षाची सुरुवात तर धूमधडाक्यात केली. मार्केटमध्ये आलेली या वर्षातली पहिली गाडी होती महिंद्र अँड महिंद्रची झायलो. टोयोटा इनोवाच्या नव्या व्हर्जनला 'झायलो' चांगलीच प्रतिस्पर्धी आहे. पाठोपाठ फियाट लिनिआ,कॅप्टिवा ए.टी, सोनाटा एम्बेरा, बीएमडब्ल्यू सेवन आणि थ्री सीरिजमधल्या काही गाड्याही मार्केटमध्ये आल्या आहेत. या वर्षात पन्नास कार मॉडेल्स मार्केटमध्ये येतील अशी शक्यता आहे. लॉन्चिंगच्या या जोरदार तयारीत टू व्हीलर कंपन्याही मागे नाही. या वर्षी हीरो होंडा चार नव्या बाईक्स लॉन्च करणार आहे. बजाज ऑटो सप्टेंबरपर्यंत सहा नवी बाईक्स मॉडेल्स आणणार आहे. ज्यात 250 सीसीची कावासाकी निंजादेखील आहे. वायझेड 15 आणि एफझेड 16 या बाईक्सना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आता यामाहादेखील नव्या लॉन्चचा विचार करत आहे. याशिवाय टाटांची बहुचर्चित नॅनोदेखील यावर्षातच रस्त्यांवर धावेल. क्रॉसओव्हर व्हेईकल सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स 'टाटा इंडिक्रूझ' आणि इंडिगोची नवी मॉडेल्स आणणार आहे.

  • Share this:

First published: