• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • अहमदनगरचा अतुल कानडे 'एमपीएसी'त राज्यात पहिला !

अहमदनगरचा अतुल कानडे 'एमपीएसी'त राज्यात पहिला !

  • Share this:
mpsc44406 एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झालाय. अहमदनगरचा अतुल अनिल कानडे राज्यात आणि मागासवर्गीय उमेदवारांमध्ये पहिला आला आहेत. तर पुण्यातला राहुल धसने दुसरा क्रमांक पटकावलाय. अतुल कानडे हा अहमदनगर जिल्ह्यात रहिवासी असून त्याने इंजीनियरिंग केलंय. राज्यातल्या एकूण 368 राजपत्रित अधिकार्‍यांच्या पदांसाठी यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. पुण्यातला राहुल धस हा राज्यात दुसर्‍या क्रमांकावर आलाय. त्याने एमपीएसी परीक्षेत पहिल्या प्रयत्नातच यश मिळवलंय. त्यांची राज्यसेवा परीक्षेत पोलीस उपअधिक्षक पदासाठी निवड झालीय. तर पुणे जिल्ह्यातल्या रोहिणी दत्तात्रय नर्‍हे महिलांमध्ये पहिल्या आल्या आहेत. त्या बीटेकच्या पदवीधर आहेत. मला राज्यात पहिला येईल अशी अपेक्षा नव्हती पण निकालामुळे खूप आनंदी असून आता खूप काम करण्याची मोठी संधी मिळालीये अशी पहिली प्रतिक्रिया अतुल कानडेंनं दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: