• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • अर्थसंकल्पावेळी गोंधळ घालणाऱ्या 19 आमदारांचं निलंबन

अर्थसंकल्पावेळी गोंधळ घालणाऱ्या 19 आमदारांचं निलंबन

  • Share this:

aamadar

22 मार्च :  अर्थसंकल्प सादर होत असताना शेतकरी कर्जमाफीवरुन विधीमंडळात गदारोळ घालणा-या विरोधी पक्षातील एकूण 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. या आमदारांचं 9 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

यामध्ये काँग्रेसच्या 10 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, निलंबनाच्या कारवाईविरोधात विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला आहे.

निलंबन करण्यात आलेल्या आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, काँग्रेसचे अब्दुल्ल सत्तार यांच्यासह अनेक आमदारांचा समावेश आहे.

संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता. 31 डिसेंबरपर्यंत या आमदारांचं निलंबन करण्यात यावं असा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. त्यांचा हा प्रस्ताव मान्य करत गोंधळी आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे असे आरोप ठेवून या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे १८ मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत विरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता.

दरम्यान, निलंबनाच्या कारवाईविरोधात विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: