• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • संप मागे घ्या नाहीतर कारवाई करू - एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना नोटीस

संप मागे घ्या नाहीतर कारवाई करू - एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना नोटीस

  • Share this:
FTII and gajendra

15 जुलै : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात  एफटीआयआयचे संचालक डी जे नरेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना नोटीस धाडली आहे. संप तातडीने मागे घ्या, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करू, असा इशारा नरेन यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेते आणि भाजप कार्यकर्ते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्ती विरोधात गेल्या महिन्याभरापासून एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे.

एफटीआयआयचे संचालक डी जे नरेन यांनी आज विद्यार्थ्यांना एक नोटीस बजावली आहे. चौहान यांच्याविरोधात सुरू असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांनी तातडीने मागे घ्या, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

दरम्यान, एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी चौहान यांच्याविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. तर केंद्र सरकार देखील आपल्या भूमिकेवर ठामच आहे. गेल्या महिन्याभर सुरू असलेल्या या आंदोलनावर आता केंद्राने कठोर भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यावर आता विद्यार्थी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published: