• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • बजेट : वीज 20 टक्क्यांनी स्वस्त, पोलीस दलात मोठी भरती

बजेट : वीज 20 टक्क्यांनी स्वस्त, पोलीस दलात मोठी भरती

 • Share this:

ajit pawar budget 425 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकांचं चांगभलं म्हणत राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार महिन्यांसाठीचं राज्याचं हंगामी बजेट सादर केलं आहे. 5000 कोटींच्या महसुली तुटीचं बजेट अजित पवार यांनी सादर केलं. या बजेटमध्ये पोलिसांसाठी जवळपास 61 हजार 500 पदं निर्माण करणं, मेट्रोचा दुसरा टप्पा लवकर पूर्ण करणं, सुकन्या योजना, अशा अनेक आश्वासनांचा पाऊस अर्थमंत्र्यांनी पाडला.

तसंच महावितरणच्या माध्यमातून वीजग्राहकांना 20 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. या सवलतीमुळे तिजोरीवर 700 कोटींचा बोजा पडणार आहे. आचारसंहिताची मर्यादा लक्षात घेता मागील बजेटमध्ये सोलापूर चादर, चहा, मणुके, बेदाने याच्यावर करमाफी देण्यात आली होती ती कायम ठेवण्यात आलीय.

बजेट नंतर अजित पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. अन्न सुरक्षा कायद्या, रोजगार, महिलांचे प्रश्न आणि आरोग्य हे बजेटचे अग्रक्रम होते. त्यामुळे आम्ही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरू असा विश्वास अजित पवार पवारांनी व्यक्त केला. निवडणुकीनंतर जूनमध्ये पूर्ण अर्थसंकल्प मांडणार असल्याचंही अजित पवार स्पष्ट केलं.

बजेटमध्ये घोषणांचा पाऊस अनुसुचित जाती आणि नवबौद्धांसाठी असलेल्या रमाई आवास योजनेसाठी 333 कोटी 39 कोटी प्रस्तावित मंजुरी देण्यात आली. संपूर्ण राज्यात राजीव गांधी जीवनदायी योजना राबवण्यात येणार आहे. राज्यातील रस्ते विकासासाठी 2836 कोटी 67 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलीय. तर महावितरणच्या माध्यमातून वीजग्राहकांना 20 टक्के सवलत देण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाची दखल घेत अंगणवाडी सेविकांच्या मदतनीसांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली. अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त झाल्यास 1 लाख रुपयांची घोषणा करण्यात आलीय. त्याचबरोबर अल्पसंख्यांक ग्रामीण क्षेत्रात मुलभूत सुविधांसाठी 40 कोटींची तरतूद करण्यात आलीय. नाशिकमध्ये 2015 मध्ये सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी 2378 कोटी 78 लाखांची भरघोस तरतूद करण्यात आली.

नागपुरात दोन मेट्रोला मान्यता तर पिंपरी-निगडी वाढीव मेट्रोलाही तत्वत: मान्यता

मुंबईत मोनोरेलचा दुसरा टप्पा प्रगतीपथावर असून हा टप्पा पूर्ण होण्यासाठी आणखी दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. मुंबईतला दुसरा मोठा प्रकल्प म्हणजे मुंबई मेट्रो रेल्वे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर लवकरच मेट्रो कार्यान्वित होणार असल्याचं अजित पवारांची जाहीर केलं. तसंच मुंबई पाठोपाठ पुण्यात मेट्रो प्रकल्पाची अगोदरच घोषणा करण्यात आलीय. आता पिंपरी-निगडी वाढीव मेट्रोला तत्वत: मान्यताही देण्यात आलीय. त्यापाठोपाठ नागपूरमध्ये 38 किमीचे दोन मेट्रोला मान्यता देण्यात आलीय. या मेट्रोसाठी 8 हजार 680 कोटींची तरतूद करण्यात आलीय.

अर्थमंत्री अजित पवारांच्या भाषणातील ठळक मुद्दे
 • - राज्यातील दरडोई उत्पन्नात वाढ झालेली आहे
 • - साक्षरता दरात वाढ झाली असून अर्भक मृत्यूदर खाली आलाय.
 • - अनुसुचित जाती आणि नवबौद्धांसाठी असलेल्या रमाई आवास योजनेसाठी 333 कोटी 39 कोटी प्रस्तावित
 • - राजीव गांधी जीवनदायी योजना संपूर्ण राज्यात राबवणार
 • - शेतीसाठी विविध योजना राबवण्यात येणार असून शाश्वत शेतीवर भर देण्यात येईल
 • - शेततळ्यांच्या प्लास्टीक अस्तरीकरणासाठी केंद्र सरकार 50 टक्के तर राज्य सरकार 25 टक्के अनुदान देणार
 • - ग्रामीण दलित वस्ती स्वच्छता योजनेसाठी 60 कोटींचा निधी
 • - महाराष्ट्र तंत्र शास्त्र विद्यापीठासाठी 10 कोटी
 • - अल्पसंख्यांक ग्रामीण क्षेत्रात मुलभूत सुविधांसाठी 40 कोटी
 • - स्त्रीभ्रुणहत्या रोखण्यासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढवणे, शिक्षण आरोग्य सुधारणा, बालविवाह रोखणे यासाठी सुकन्या योजनेची घोषणा
 • - सुकन्या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील मुलीच्या खात्यात दरमहा 200 रूपये
 • - महिलांच्या सुरक्षेसाठी शाळा महाविद्यालयात प्रशिक्षण
 • - राज्य पोलीस दलासाठी 61 हजार 494 पदं निर्माण करणार
 • - राज्य सुरक्षा आयोग, पोलीस तक्रार प्राधीकरणासाठी 133 पदं भरणार
 • - गृहरक्षक आणि नागरी रक्षक दलासाठी स्वयंसेवक म्हणून काम करणा-यांच्या मोबदल्यात दुपटीनं वाढ
 • - मुंबईत मोनोरेलचा दुसरा टप्पा प्रगतीपथावर. त्यासाठी आणखी दीड वर्षं लागणार
 • - वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर लवकरच कार्यान्वित होणार
 • - पिंपरी-निगडी वाढीव मेट्रोला तत्वत: मान्यता
 • - नागपूर 38 किंमी चे दोन मेट्रोला मान्यता
 • - नागपूर मेट्रोसाठी 8 हजार 680 कोटी
 • - सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी 2378 कोटी 78 लाख
 • - नवी मुंबई सिडको विमानतळासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या
 • - पहिल्या टप्प्यात 1 कोटी प्रवासी घेणार सेवेचा लाभ
 • - विमानतळ विकासासाठी 165 कोटी
 • - उद्योग व्यापारवाढीसाठी विमानतळाचं जाळं निर्माण करणार
 • - नागपूर मिहान प्रकल्पांमध्ये नामांकित सॉफ्टवेअर कंपन्या
 • - राज्यातील रस्ते विकासासाठी 2836 कोटी 67 लाख
 • - महावितरणच्या माध्यमातून वीजग्राहकांना 20 टक्के सवलत
First published: