मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /होती 15 वर्षांची आघाडी झाले 15 दिग्गज नेते पराभूत !

होती 15 वर्षांची आघाडी झाले 15 दिग्गज नेते पराभूत !

    rane_patil_malik_ahir19 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 15 मंत्र्यांना पराभवाला सामोर जायला लागलंय. काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला तो नारायण राणेंच्या रूपात. पक्षाच्याच नाही तर नेत्यांच्या पराभवालाही नेमकं काय कारण आहे याची चर्चा आता सुरू झालीय.

    कणकवलीतून नितेश राणे विजयी झाले खरे...पण वडलांच्या पराभवाचा त्यांना मोठा धक्का बसला. ज्या कोकणाने नारायण राणेंना आजवर साथ दिली त्याच कोकणच्या भूमीत राणेंना पराभवाची चवही चाखायला लागली. जिथे राणेंसारख्या वकुबी हरले तिथे इतरांची काय तमा. आघाडीच्या इतर दिग्गजांना तर सर्वस्वच गमवावं लागलं. या निवडणुकीत पराभूत होणार्‍या दिग्गजांची यादी फार मोठी आहे. कुडाळमधून माजी उद्योगमंत्री नारायण राणे, इंदापूरमधून माजी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील,आर्णीमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, बेलापूरमधून माजी उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक, औरंगाबाद पूर्वमधून माजी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, अंधेरी पूर्वमधून माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, काटोलमधून माजी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, नागपूर उत्तरमधून माजी रोहयो मंत्री नितीन राऊत, आष्टीमधून माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस, कोल्हापूर दक्षिणमधून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित पालघरमधून, राळेगावमधून माजी विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके, कामठीमधून माजी ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक  आणि अणुशक्तीनगरमधून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक या दिग्गजांचा धक्कादायक पराभव झाला.

    या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत. 15 वर्षांच्या सत्तेनंतर आघाडी सरकारच्या विरोधात आलेली अँटी इनकम्बन्सी या नेत्यांना भोवली की मोदी लाटेचा फटका बसला. याची कारणमिमांसा आता होईलच. म्हणूनच राष्ट्रवादीने आधीच पृथ्वीराज चव्हाणांवर पराभवाचं खापर फोडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय. दिग्गजांच्या या पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विधानसभेतली भूमिका आता खूपच मर्यादित झालीय, एवढं मात्र नक्की.

    हे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पराभूत दिग्गज

    कुडाळ

    नारायण राणे (काँग्रेस)

    माजी उद्योगमंत्री

    इंदापूर

    हर्षवर्धन पाटील (काँग्रेस)

    माजी संसदीय कामकाजमंत्री

    आर्णी

    शिवाजीराव मोघे (काँग्रेस)

    माजी सामाजिक न्यायमंत्री

    बेलापूर

    गणेश नाईक (राष्ट्रवादी)

    माजी उत्पादन शुल्कमंत्री

    औरंगाबाद -पूर्व

    राजेंद्र दर्डा (काँग्रेस)

    माजी शालेय शिक्षणमंत्री

    अंधेरी - पूर्व

    सुरेश शेट्टी (काँग्रेस)

    माजी आरोग्यमंत्री

    काटोल

    अनिल देशमुख (राष्ट्रवादी)

    माजी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री

    नागपूर -उत्तर

    नितीन राऊत (काँग्रेस)

    माजी रोहयो मंत्री

    आष्टी

    सुरेश धस (राष्ट्रवादी)

    माजी महसूल राज्यमंत्री

    कोल्हापूर - दक्षिण

    सतेज पाटील (काँग्रेस)

    माजी गृहराज्यमंत्री

    वरळी

    सचिन अहिर (राष्ट्रवादी)

    माजी गृहनिर्माण राज्यमंत्री

    पालघर

    राजेंद्र गावित (काँग्रेस)

    माजी आदिवासी विकास राज्यमंत्री

    राळेगाव

    वसंत पुरके (काँग्रेस)

    माजी विधानसभा उपाध्यक्ष

    कामठी

    राजेंद्र मुळक (काँग्रेस)

    माजी ऊर्जी राज्यमंत्री

    अणुशक्तीनंगर

    नवाब मलिक (राष्ट्रवादी)

    राष्ट्रवादी प्रवक्ते

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    [if0] Follow @ibnlokmattv[sc0]

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    First published:
    top videos

      Tags: Election 2014, Maharashtra result