03 ऑगस्ट : लोकसभेत काँग्रेसच्या 25 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीये. एकाच वेळी 25 खासदारांवर निलबंनाच्या कारवाईमुळे काँग्रेस मोदी सरकारवर सडकून टीका केलीये. हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याची संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिली.
तर संसदेलाही गुजरात मॉडेल राबवण्याचा प्रयत्न आहे. मुळात सभागृह एकतर्फी चालवण्याचा सरकारचा डाव असा आरोपच काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून लोकशाहीविरोधी, हुकूमशाही प्रवृत्ती वाढतेय अशी टीका राजीव शुक्ला यांनी केली.
ही कारवाई मुळात चुकीची आहे. आम्ही कोणतंही बॅनर सभागृहात धरलंच नव्हतं असा दावा काँग्रेसचे निलंबित खासदार निनाँग एरिंग यांनी केलाय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, NDA, Sonia gandhi