Home /News /news /

हाच का 'सबका साथ, सबका विकास?',चव्हाणांचं टीकास्त्र

हाच का 'सबका साथ, सबका विकास?',चव्हाणांचं टीकास्त्र

chavan on fadanvis405 मार्च : हाच का 'सबका साथ, सबका विकास' मुळात भाजपची ही घोषणा पोकळ असून देशाची एकात्मता मोडून काढण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जात आहे अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण केलीये. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुस्लीम आरक्षण लागू न केल्यास अधिवेशन चालू देणार नाही असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

मुस्लिमांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण लागू करण्यात आलं होतं. मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती पण मुस्लीम आरक्षणाला फक्त शिक्षणामध्ये मान्यता दिली होती. मात्र, राज्य सरकारने अध्यादेश काढून सरकट मुस्लीम आरक्षण रद्द केलंय. त्यामुळे आज काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबईचे शहराध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या निर्णयावर सडकून टीका केली.

आघाडी सरकारच्या काळात मुस्लीम आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता. तो आता युती सरकारने रद्द करून मुस्लीम समाजाला वार्‍यावर सोडलंय. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस मुस्लीम आरक्षणाचा विषय लावून धरणार असल्याचं अशोक चव्हाणांनी जाहीर केलंय. सरकारला फेर विचार करून मुस्लिमांना आरक्षण द्यायला भाग पाडू असंही ते म्हणाले. हे आरक्षण लागू न केल्यास, अधिवेशन चालू देणार नाही असा इशाराही अशोक चव्हाणांनी दिलाय.

हे सरकार देशातला आणि राज्यांमधला जातीय एकोपा मोडून काढण्याचं काम करत असल्याची टीकाही त्यांनी केलीय. तर मुस्लीम समुदायातील 50 मागासवर्गीय जातींना आरक्षण देण्यात आले होतं, पण भाजप सरकारने मुस्लीम मागास जातींचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेतल्याचं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Ashok chavan, Devendra Fadanvis, Maratha aarakshan, अशोक चव्हाण, आरक्षण, काँग्रेस, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, फडणवीस, मुस्लीम समाज

पुढील बातम्या