मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

स्पेशल रिपोर्ट : योगी आदित्यनाथांमुळे नाथपंथी पुन्हा चर्चेत !

स्पेशल रिपोर्ट : योगी आदित्यनाथांमुळे नाथपंथी पुन्हा चर्चेत !

20 मार्च : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची वर्णी लागल्यामुळे देशभर पसरलेले नाथपंथी पुन्हा एकदा चर्चेत आलेत. महाराष्ट्रातही नाथपंथीयांचं मोठं प्रस्थ आहे. अनेक ठिकाणी नवनाथांची पूजा-अर्चा केली जाते.

भारताच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच वेळ असेल की एखाद्या पंथाचा सर्वोच्च महंत देशातल्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या राज्याच्या प्रमुखपदी विराजमान झालेला असेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्याचे देशभर पसरलेल्या नाथपंथीयांचं  मुख्य मंदिर असलेल्या आणि मठाचे प्रमुख महंत आहेत. हे मंदीर आहे उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये ज्याच्या नावावरून हा जिल्हा ओळखला जातो आणि त्याचे खासदार म्हणून योगी आदित्यनाथ पाचव्यांदा निवडले गेले आणि आता तर मुख्यमंत्रीही.yogi_pkg_44

नाथ संप्रदाय हा शैव संप्रदाय असून शिव किंवा महादेवापासून ह्या संप्रदयाची सुरुवात झाल्याचं मानलं जातं. विशेष म्हणजे ह्याचा मुख्य मठ हा गोरखपूरला असला तरीसुद्धा नाथपंथाचा उगम मात्र त्र्यंबकेश्वरला झाल्याचं सांगितलं जातं. मच्छिंद्रनाथांनी ह्या पंथाची स्थापना केली आणि त्यांचं शिष्यत्व पत्करलेल्या गोरक्षनाथ किंवा गोरखनाथांनी त्याला शिस्त आणि नियम अटी लावल्या. विशेष म्हणजे संत ज्ञानेश्वरांचाही ह्या नाथपंथाशी संबंध होता आणि त्यांचे बंधू निवृत्तीनाथांकडून त्यांना दिक्षा मिळाल्याचं बोललं जातं.

नाथ संप्रदाय आठव्या ते बाराव्या शतका दरम्यान उगम आणि विस्तारत गेला. गोरखनाथांनी त्यासाठी देशभ्रंमती केली. 40 पेक्षा जास्त ग्रंथांचं लिखान केलं. गोरखनाथांनीच त्र्यंबकेश्वरला नऊ नाथांना आणि 84 सिद्धांना उपदेश केला. त्यांच्यामुळे गोदावरीला गंगा म्हटलं जातं. कारण गोरखनाथांच्या तपस्येनंतरच गंगा अवतरल्याची अख्यायिका आहे. म्हणून नाथपंथीय गोदावरीला गंगा मानतात.

नाथ संप्रदयात 12 पंथ आहेत आणि त्यातल्या एका योग्याची प्रमुखपदी नियुक्ती केली जाते. योगी आदित्यनाथ यांचीही नाथपंथीयांच्या सर्वोच्चपदी नियुक्ती अशीच झालीय. महत्वाचं म्हणजे नाथ पंथीय देशभर आजही प्रवास करत रहातात. अजूनही गावोगावी नाथ पंथीयांच्या पोथ्या वाचल्या जातात. जे नऊ नाथ आहेत त्यांची पूजा केली जाते. फक्त महाराष्ट्रच नाही तर कन्याकुमारीपासून अफगाणिस्तानातील कंदहार, पाकिस्तानातील पेशावर, दक्षिणेला श्रीलंकेपर्यंत  नाथ पंथीयांनी प्रवास करत पंथाचा प्रसार केल्याचा इतिहास आहे. नेपाळमध्येही गोरखा नावाचा जिल्हा हा गोरखनाथांच्याच नावावर आहे आणि आपल्याकडे गुरखा रेजिमेंट किंवा आढळणारे गोरखा हेही नाथपंथीयच असून गोरखनाथाच्याच नावावर त्यांची ओळख तयार झालीय. त्याच पंथाचा सर्वोच्च महंत आता देशाच्या सर्वोच्च राजकीय पदांपैकी एकावर विराजमान झालाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Amit Shah, BJP, उत्तरप्रदेश, भाजप

पुढील बातम्या