मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

स्पेशल रिपोर्ट : ट्रम्प हे करून दाखवतील का ?

स्पेशल रिपोर्ट : ट्रम्प हे करून दाखवतील का ?

21 जानेवारी : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. मात्र व्हाईट हाऊसमध्ये पाउल ठेवण्यापुर्वीच ट्रम्प यांची लोकप्रियतेला ओहोटी लागलेली आहे. दुभंगलेल्या अमेरिकेच्या या राष्ट्राध्यक्षापुढं मोठी आव्हानं आहेत.trump34

दुभंगलेली मनं, असुरक्षितता, वाद, प्रतिवादाच्या गडद छायेत डोनाल्ड यांनी अखेर ट्रम्प टॉवर सोडलाय.  मात्र व्हाईट हाऊसमध्ये शिरताना ट्रम्प यांची लोकप्रियता कमालीची ओसरलीय. सध्या ट्रम्प यांची लोकप्रियता 44 टक्यापर्यंत खाली आलीय. अमेरिकेच्या इतिहासात नवनियुक्त राष्ट्राध्यक्षाची लोकप्रियता एवढ्या खाली कधीच गेली नव्हती. अगदी व्हाईट हाऊस सोडताना ओबामा यांची लोकप्रियता 55 टक्यावर आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची लोकप्रियता जॉर्ज बुश (ज्युनिअर)-58 टक्के    बराक ओबामा- 68 टक्के डोनाल्ड ट्रम्प – 44 ते 40 टक्के दुसरीकडे ट्विटरवर एकाच फटक्यात प्रतिस्पर्ध्यांना लोळवणाऱ्या ट्रम्प यांच्यापुढं प्रत्यक्षात मोठी आव्हान आहेत. या प्रश्नावर ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार आहे. ते बघावं लागेल  ट्रम्प यांच्यापुढची  आव्हानं ? सिरीयामध्ये तुर्की-रशियाची युती कशी भेदणार, इसिसविरूद्धची अमेरिकेची रणनीती काय ? कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या पॅरीस कराराचं आता पुढं काय? इराणसोबतचा अणुकरार रद्द करणार का ? दक्षिण-पूर्व आशियामधील चीनचा वाढता लष्करी प्रभाव कमी कसा करणार ? दक्षिण कोरिया, तैवान, जपान, या तिन्ही मित्र राष्ट्रांना अमेरिका आता सुरक्षेची हमी देणार का ? अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य पूर्णतः माघार घेणार ? भारतासोबत ट्रम्प यांच धोरण कस असेल ? NSG क्लबमध्ये भारताच्या प्रवेशाबद्दल चीनचा विरोध मोडीत काढणार?   ट्रम्प केवळ बोलघेवडे आहेत की प्रत्यक्ष कृती करणारे हे लवकरच जगाला कळेल. मात्र त्याचे बरे, वाईट परिमाण मात्र संबंध जगाला भोगावे लागतील.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Donald Trump, USA, अमेरिका, ट्रम्प

पुढील बातम्या