Home /News /news /

स्पेशल रिपोर्ट : 'चल गुरूजी सेल्फी लेले रे' !

स्पेशल रिपोर्ट : 'चल गुरूजी सेल्फी लेले रे' !

  04 नोव्हेंबर : चल बेटा सेल्फी लेले रे...हे गाणं आपण ऐकलंच असेल पण, आता शाळेतली मुलं चल गुरूजी सेल्फी लेले रे,...असं म्हटली नाहीत तर अजिबात आश्चर्य वाटू देऊ नका....कारण आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनीच तसा अजब फतवा काढलाय..विश्वास बसत नाही ना मग बघा हा आयबीएन लोकमतचा स्पेशल रिपोर्ट...

tawade_selfy_pkgआपल्या राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे नेहमीच काहीतरी भन्नाट आयडिया वापरून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात...आता देखील त्यांनी अशाच एक जगावेगळा निर्णय त्यांनी घेतलाय. आणि तो म्हणजे...सेल्फी विथ गुरूजी...हा बघा त्याचा जीआर....या शासन निर्णयानुसार शिक्षकांना दर सोमवारी मुलांसोबत सेल्फी काढून तो 'सरल' प्रणालीवर अपलोड करायचा आहे. त्यामुळे येत्या जानेवारीपासून शाळेचा आठवड्याचा पहिला तास हा तशा अर्थाने सेल्फीतासच ठरणार आहे. विनोद तावडेंच्या या सेल्फी विथ गुरूजींच्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली नाहीतरच नवलच...विरोधकांनी यावर कडाडून टीका केलीये आणि विनोद तावडेंच्या नावातच विनोद असल्याचा खोचक टोला लगावलाय.

खामगावच्या आश्रमशालेतला बलात्काराचा धक्कादायक प्रकार पाहता खरंतर सध्या सेल्फी विथ गुरूजी ऐवजी मुलांच्या सेफ्टीची सर्वाधिक गरज आहे..पण आपले शिक्षण मंत्री भलतेच चतूर दिसताहेत...म्हणूनच कदातिच त्यांना हे असले सेल्फीसारखे फंडे सुचत असावेत..असो...बघुयात त्यांच्या अफलातून निर्णयामुळे नेमकी किती शाळाबाह्य विद्यार्थी कमी होताहेत ते....कारण यापूर्वीही विनोद तावडेंनी शालेय दप्तराचं वजन करून पाहिलं होतं. पण अजूनही मुलांच्या पाठीवरचं ओझं काही कमी झालेलंच नाही. एवढंच काय आश्रमशाळांमधली बोगस हजेरीपट कमी करण्यासाठी साधी बायोमेट्रीक प्रणाली यंत्रणा देखील अजून शाळांमध्ये बसलेली नाही .एकूणच काय तर शालेय शिक्षणाचा नुसता पोरखेळ चाललाय, असंच इथं खेदानं नमूद करावसं वाटतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: School, Vinod tawade, विनोद तावडे

पुढील बातम्या