Home /News /news /

स्थळ : पुणे 52, काळ :1991 !

स्थळ : पुणे 52, काळ :1991 !

अमोल परचुरे,समिक्षकपुणे 52 या सिनेमाचा काळ आहे 91-92 चा...पुणे 52 म्हणजे कर्वेनगर मध्ये राहणारा अमर आपटे (गिरीश कुलकर्णी) हा डिटेक्टीव्ह, इमाने इतबारे, प्रसंगी जीव धोक्यात घालून तो कसाबसा तो आपला हेरगिरीचा बिझनेस पुढे रेटतोय. नियमित कमाई नसल्यामुळे बायको प्राची(सोनाली कुलकर्णी ) पण वैतागलेली आहे, कारण काटकसर आणि थकलेली उधारी...अशातच अमर आपटेकडे एक केस येते आणि त्याचा तपास करता करता अमर आपटेचं आयुष्य बदलूनच जातं. अशी ही एका डिटेक्टीव्हची कथा. यात महत्त्वाचं म्हणजे 91 चा काळ दाखवण्यासाठी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. बेटा सिनेमातलं पोस्टर असेल, बॅकग्राऊंडला त्याकाळातली गाणी असतील, त्या काळातलं फर्निचर हे सगळं आहेच पण उदारीकरण धोरणाचा संदर्भही दिसतो पण उदारीकरणामुळे झालेले बदल आणि अमर आपटेच्या आयुष्यातील बदल यांची सांगड सिनेमात दिसत नाही. या गोष्टी वगळून केवळ सायकोलॉजिकल सस्पेन्स म्हणून विचार केला तर त्या सस्पेन्सचं कारणच कमजोर वाटतं. म्हणजेच स्क्रीप्टमध्ये थोडा आणखी विचार व्हायला पाहिजे होता, यामुळेच प्रेक्षक बाहेर पडल्यावर स्क्रीप्टचा जास्त विचार करत राहतो. सिनेमा दर्जेदार आहे पण म्हणजे तो परिपूर्ण आहे का ? या प्रश्नाचं उत्तर नाही असं द्यावं लागतं. दिग्दर्शक निखिल महाजनचं यश म्हणजे सिनेमा बघताना आपण गुंतून राहतो. पण सिनेमा बघून बाहेर पडल्यावर अनेक प्रश्न पडतात, अनेक गोष्टी पटत नाहीत किंवा काही सीन्सची खरंच गरज होती का असं वाटत राहतं. एकीकडे सिनेमा आवडलेला असतो, पण दुसरीकडे मनात घर केलेले प्रश्न पिच्छा सोडत नाहीत अशी आपली अवस्था होऊन जाते. सिनेमा बघताना आपण गुंतून राहतो. त्याचं कारण म्हणजे सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय, संवाद, सिनेमाचं टेकिंग, छायाचित्रण, एडिटिंग, पार्श्वसंगीत सगळंच एकदम उच्च दर्जाचं आहे. मराठीत वेगळा प्रवाह आणण्याची धडपड करणार्‍यांसाठी तर अगदी अभ्यास करावा असंच आहे. पण पटकथेच्या पातळीवर जी थोडी गडबड झालीये त्यामुळेच सिनेमा संपल्यानंतर अनेक प्रश्न आपल्याला त्रास देत राहतात. अभिनय ही या सिनेमाची भक्कम बाजू...'गंध' वगळता केवळ ग्रामीण भूमिकांमध्येच दिसलेल्या गिरीश कुलकर्णीचा हा आत्तापर्यंत जबरदस्त अभिनय म्हणायला हवा. भूमिका जगणं म्हणजे काय ते त्याने अफलातून दाखवलंय. अमर आपटे या गुप्तहेराचं स्वत:च्या कामाशी प्रामाणिक असणं, सतत जागरुक असणं, विचार करणं, बायकोशी भांडताना त्याचं बोलणं अशा सगळ्याच सीन्समध्ये त्याने सुंदर नैसर्गिक अभिनय साकारलाय.असाच सुंदर अभिनय केलाय सोनाली कुलकर्णीनं. अमर आपटेच्या बायकोच्या भूमिकेत ती एकदम फिट्ट वाटते, तगमग, वैताग, समजुतदारपणा, असे सगळे रंग तिने छान दाखवलेत. तसंच सई ताम्हणकर चं सांगता येईल. तिच्या एंट्रीनंतर वेगाने घडणार्‍या घटनांमध्ये तिचा अभिनय अतिशय महत्त्वाचा ठरलाय. तिच्या बोल्ड सीन्सची चर्चा झाली असली तरी त्यापलीकडे जाऊन तिने सशक्त अभिनयाचंसुध्दा प्रमाण दिलेलं आहे. किरण करमरकर, स्वानंद किरकिरे, भारती आचरेकर, गो.पु.देशपांडे अशा सर्वच कलाकारांनी सिनेमाचा काळ लक्षात घेत अतिशय समंजसपणे आपलं काम केलेलं आहे. जेरेमी रेगनचा कॅमेराही महत्त्वाचा कारण वेगळ्या प्रकारच्या फ्रेम्सच नाहीत तर त्यानुसार केलेलं लायटिंगही खूपच प्रभावी ठरलंय. अशा सगळ्याच पातळयांवर सरस ठरलेला सिनेमा कथेत काहीसा मागे पडत असला तरी एवढं नक्कीच सांगेन की तुम्ही तुमचं मत सिनेमा बघूनच ठरवा. भिन्न प्रवृत्तीच्या प्रेक्षकांना वेगवेगळा अनुभव देणारा हा सिनेमा आहे, कोणाला तो जड वाटेल, कोणाला खूप आवडेल पण त्यासाठी हा वेगळा प्रयोग एकदा तरी पाहायला हवा असाच आहे.'पुणे 52 ' रेटिंग - 100 पैकी 75 गुण

पुढे वाचा ...

अमोल परचुरे,समिक्षक

पुणे 52 या सिनेमाचा काळ आहे 91-92 चा...पुणे 52 म्हणजे कर्वेनगर मध्ये राहणारा अमर आपटे (गिरीश कुलकर्णी) हा डिटेक्टीव्ह, इमाने इतबारे, प्रसंगी जीव धोक्यात घालून तो कसाबसा तो आपला हेरगिरीचा बिझनेस पुढे रेटतोय. नियमित कमाई नसल्यामुळे बायको प्राची(सोनाली कुलकर्णी ) पण वैतागलेली आहे, कारण काटकसर आणि थकलेली उधारी...अशातच अमर आपटेकडे एक केस येते आणि त्याचा तपास करता करता अमर आपटेचं आयुष्य बदलूनच जातं. अशी ही एका डिटेक्टीव्हची कथा.

यात महत्त्वाचं म्हणजे 91 चा काळ दाखवण्यासाठी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. बेटा सिनेमातलं पोस्टर असेल, बॅकग्राऊंडला त्याकाळातली गाणी असतील, त्या काळातलं फर्निचर हे सगळं आहेच पण उदारीकरण धोरणाचा संदर्भही दिसतो पण उदारीकरणामुळे झालेले बदल आणि अमर आपटेच्या आयुष्यातील बदल यांची सांगड सिनेमात दिसत नाही. या गोष्टी वगळून केवळ सायकोलॉजिकल सस्पेन्स म्हणून विचार केला तर त्या सस्पेन्सचं कारणच कमजोर वाटतं. म्हणजेच स्क्रीप्टमध्ये थोडा आणखी विचार व्हायला पाहिजे होता, यामुळेच प्रेक्षक बाहेर पडल्यावर स्क्रीप्टचा जास्त विचार करत राहतो.

सिनेमा दर्जेदार आहे पण म्हणजे तो परिपूर्ण आहे का ? या प्रश्नाचं उत्तर नाही असं द्यावं लागतं. दिग्दर्शक निखिल महाजनचं यश म्हणजे सिनेमा बघताना आपण गुंतून राहतो. पण सिनेमा बघून बाहेर पडल्यावर अनेक प्रश्न पडतात, अनेक गोष्टी पटत नाहीत किंवा काही सीन्सची खरंच गरज होती का असं वाटत राहतं. एकीकडे सिनेमा आवडलेला असतो, पण दुसरीकडे मनात घर केलेले प्रश्न पिच्छा सोडत नाहीत अशी आपली अवस्था होऊन जाते. सिनेमा बघताना आपण गुंतून राहतो. त्याचं कारण म्हणजे सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय, संवाद, सिनेमाचं टेकिंग, छायाचित्रण, एडिटिंग, पार्श्वसंगीत सगळंच एकदम उच्च दर्जाचं आहे. मराठीत वेगळा प्रवाह आणण्याची धडपड करणार्‍यांसाठी तर अगदी अभ्यास करावा असंच आहे. पण पटकथेच्या पातळीवर जी थोडी गडबड झालीये त्यामुळेच सिनेमा संपल्यानंतर अनेक प्रश्न आपल्याला त्रास देत राहतात.

अभिनय ही या सिनेमाची भक्कम बाजू...'गंध' वगळता केवळ ग्रामीण भूमिकांमध्येच दिसलेल्या गिरीश कुलकर्णीचा हा आत्तापर्यंत जबरदस्त अभिनय म्हणायला हवा. भूमिका जगणं म्हणजे काय ते त्याने अफलातून दाखवलंय. अमर आपटे या गुप्तहेराचं स्वत:च्या कामाशी प्रामाणिक असणं, सतत जागरुक असणं, विचार करणं, बायकोशी भांडताना त्याचं बोलणं अशा सगळ्याच सीन्समध्ये त्याने सुंदर नैसर्गिक अभिनय साकारलाय.असाच सुंदर अभिनय केलाय सोनाली कुलकर्णीनं. अमर आपटेच्या बायकोच्या भूमिकेत ती एकदम फिट्ट वाटते, तगमग, वैताग, समजुतदारपणा, असे सगळे रंग तिने छान दाखवलेत.

तसंच सई ताम्हणकर चं सांगता येईल. तिच्या एंट्रीनंतर वेगाने घडणार्‍या घटनांमध्ये तिचा अभिनय अतिशय महत्त्वाचा ठरलाय. तिच्या बोल्ड सीन्सची चर्चा झाली असली तरी त्यापलीकडे जाऊन तिने सशक्त अभिनयाचंसुध्दा प्रमाण दिलेलं आहे. किरण करमरकर, स्वानंद किरकिरे, भारती आचरेकर, गो.पु.देशपांडे अशा सर्वच कलाकारांनी सिनेमाचा काळ लक्षात घेत अतिशय समंजसपणे आपलं काम केलेलं आहे. जेरेमी रेगनचा कॅमेराही महत्त्वाचा कारण वेगळ्या प्रकारच्या फ्रेम्सच नाहीत तर त्यानुसार केलेलं लायटिंगही खूपच प्रभावी ठरलंय. अशा सगळ्याच पातळयांवर सरस ठरलेला सिनेमा कथेत काहीसा मागे पडत असला तरी एवढं नक्कीच सांगेन की तुम्ही तुमचं मत सिनेमा बघूनच ठरवा. भिन्न प्रवृत्तीच्या प्रेक्षकांना वेगवेगळा अनुभव देणारा हा सिनेमा आहे, कोणाला तो जड वाटेल, कोणाला खूप आवडेल पण त्यासाठी हा वेगळा प्रयोग एकदा तरी पाहायला हवा असाच आहे.

'पुणे 52 ' रेटिंग - 100 पैकी 75 गुण

First published:

पुढील बातम्या