मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /सोलापूरमध्ये न्यायाधीश श्याम रुकमेंना मारहाण

सोलापूरमध्ये न्यायाधीश श्याम रुकमेंना मारहाण

  judge

  04 मार्च : महाराष्ट्रात आज न्यायाधीशही सुरक्षित नाहीयेत की काय, असा प्रश्न पडायला लागलाय. सोलापूरमध्ये काल रात्री कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश श्याम रुकमे यांना जबर मारहाण झाली.लोखंडी सळईनं रुकमेंना मारण्यात आलं.

  न्यायालयाचं कामकाज संपल्यावर न्यायमूर्ती रुकमे आपल्या शासकीय गाडीनं घरी जात होते.अचानक त्यांच्या गाडीच्या वाटेत एक टाटा सुमो थांबली, त्यातून ४ जण उतरले, आणि रुकमेंना मारहाण सुरू केली. हात, पाय आणि सळईनं रुकमेंना मारलं. तोपर्यंत तिथे बरीच लोकं जमली.त्यांनी मारहाण थांबवली आणि पोलिसांनी सर्व चार जणांना अटक केली.

  महादेव कुदरे, दीनदयाळ गुंड, नितीन आंबुरे आणि संतोष मसले अशी त्यांची नावं आहेत. मारहाणीचं कारण अजून कळू शकलेलं नाही.


  बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  First published: