Home /News /news /

सोलापुरात दारूचा महापूर, 12 लाखांची दारू जप्त

सोलापुरात दारूचा महापूर, 12 लाखांची दारू जप्त

f78 solapur_nnews10 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांना खूश करण्यासाठी सोलापुरात दारूचा महापूर आलाय. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे लढत असलेल्या सोलापुरातून गेल्या दोन दिवसांत 12 लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आलीय.

मतदारांना पुरवण्यासाठी चोरट्या मार्गाने दारू आणली जातेय. गेल्या काही दिवसात सोलापूर शहरात मराठवाडा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील दारू माफिया सक्रिय झाले आहेत.

पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये अशी लपवून ठेवलेली आणि चेकपोस्ट चुकवून आणलेली देशी-विदेशी दारू मोठ्या प्रमाणावर सापडत आहे. पण, पोलिसांवर राजकीय दबाव असल्यानं पोलीसही अधिक माहिती पुरवू शकत नाही.

First published:

Tags: Solapur election, Sushilkumar shinde, गृहमंत्री, दारू, दारू जप्त, दारूचा महापूर, सुशीलकुमार शिंदे, सोलापूर

पुढील बातम्या