मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सैनिकांच्या पत्नींबाबत वादग्रस्त विधानानंतरही आमदार परिचारक जिंकले

सैनिकांच्या पत्नींबाबत वादग्रस्त विधानानंतरही आमदार परिचारक जिंकले

paricharak424 फेब्रुवारी :  सैनिकांच्या पत्नींबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पंढरपूरसह देशभर तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. पण, निवडणुकीवर याचे परिणाम झाले नाही. उलट परिचारकांनी 24 पैकी 22 जागा जिंकून विरोधकांचा धुव्वा उडवला.

पंढरपूरमधील सभेत प्रशांत परिचारक यांनी पत्नीच्या चारित्र्यावरच आक्षेप घेतला होता. जवान वर्षभर सीमेवर असताना या जवानांना गावाकडे मुलं होतात आणि जवान देखील पेढे वाटून त्याचा आनंद साजरा करतात असं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर याचे पडसाद राज्यासह देशभरात उमटले.  या पडसादाचं प्रतिबिंब जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीत उमटलं आणि आ. परिचारकांना मोठा राजकीय फटका बसेल असा तर्क बांधला जात होता. मात्र, पंढरपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत २४ पैकी २२ जागा जिंकून परिचारकांनी विरोधकांना धोबीपछाड दिला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Pandharpur, पंढरपूर

पुढील बातम्या