Home /News /news /

सेन्सेक्स 700 अंशांनी घसरला, रुपया @ 62

सेन्सेक्स 700 अंशांनी घसरला, रुपया @ 62

Image img_172882_sensex_240x180.jpg16 ऑगस्ट : देशाची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल असा विश्वास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला होता पण आज शेअर बाजारात याचे उलटे चित्र पाहायला मिळाले. सेन्सेक्स तब्बल 700 अंशांनी गडगडला. तर निफ्टातही 200 अंशांची घसरण झाली.

दोन वर्षांतली ही सर्वांत मोठी घसरण आहे. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्रालयातल्या अधिकार्‍यांची उच्चस्तरीय बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. परकीय चलनावर आरबीआयनं घातलेल्या कडक निर्बंधामुळे शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला आहे.

बाजारांची अडचण काय? - रिझर्व्ह बँकेचा व्याजदर वाढवण्याचा उपाय निष्फळ - परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारांतून पैसा काढून घेतायेत - दूरगामी गुंतवणूकदार चिंतेत, भारतात पैसा गुंतवणार नाहीत - भारतीय कंपन्यांवर परदेशात गुंतवणूक करण्याबाबत बंधन

रूपयाने केली साठी पार दुसरीकडे रुपयाचीही घसरण सुरूच आहे. रुपयानं डॉलरमागे 61 रुपये 91 पैसे इतका निचांक गाठला होता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं उपाय योजल्यामुळे रुपया काहीसा सावरलाय. आता रूपयाचा भाव डॉलरमागे 61 रुपये 33 पैसे इतका झालाय. रुपयाच्या घसरणीचा फटका शेअर बाजारालाही बसला आणि सेन्सेक्स 700 अंकानी कोसळला. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा भाव घसरल्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून डॉलर काढून घ्यायला सुरुवात केली. त्याला रिझर्व्ह बँकेनं बंदी घातल्यानंतर रुपयाची घसरण थांबली.

First published:

Tags: Pmo, Rbi, Sensex

पुढील बातम्या