मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सेनेचे आमदार घोसाळकरांकडून मानसिक छळ, भाजप नगरसेविकेचा आरोप

सेनेचे आमदार घोसाळकरांकडून मानसिक छळ, भाजप नगरसेविकेचा आरोप

45 vinod ghosalkar 4326 जुलै : शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर महिला नगरसेविकांना त्रास दिल्याबद्दल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजप नगरसेविका मनीषा चौधरी यांनी विनोद घोसाळकरांच्या विरुद्ध तक्रार केलीये.

शिवसेना आमदार विनोद घोसाळकरांकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना प्रत्यक्ष भेटून घोसाळकर प्रकरण कानावर घातलंय. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार या भाजप नेत्यांना भेटून त्यांनाही या प्रकरणाची कल्पना देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

बोरिवलीच्या एक्सर परिसरातील चौकाला मनिषा चौधरी यांच्या पुढाकारानं दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचं नाव देण्यात आलंय. मात्र ते नाव बदलून 'एक्सर गावदेवी चौक' असं त्याचं नामकरण करण्याचा आग्रह घोसाळकरांनी पालिकेकडे धरल्याचा चौधरी यांचा आरोप आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी घोसाळकर त्रास देत असल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: नगरसेविका, भाजप, विनोद घोसाळकर

पुढील बातम्या