17 जून : जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हसावदच्या प्रकरणात न्यायालयापुढे शरणागती पत्कारली. त्यांना जळगाव न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.
2008 मध्ये गुलाबराव पाटील यांनी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली होती. संस्थेचे सभासद महारू काशीनाथ बेलदार हे 1996 सालीच मृत झालेले असताना ते सभेला हजर असल्याचं दाखवण्यात आलं. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांना गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावलीये.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: गुलाबराव पाटील, जळगाव, शिवसेना