Home /News /news /

सेनेचा वचननामा फेकुगिरीची हद्द,आव्हाडांचं टीकास्त्र

सेनेचा वचननामा फेकुगिरीची हद्द,आव्हाडांचं टीकास्त्र

jitendra awadha23 जानेवारी : शिवसेनेचा वचननामा म्हणजे निव्वळ फेकुगिरीची हद्द आहे अशी शब्दात  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली. ठाणेकरांसाठी या जाहीरनाम्यातील बहुतांश कामं ही मनपा आयुक्तांनीच मार्गी लावली असून त्याचा पाठपुरावा आपण स्वतः वारंवार केल्याचा आरोपही आव्हाड यांनी केलाय. हा जाहीरनामा ठाण्यात जाहीर केला असता तर पक्षाचं हसं झालं असतं म्हणूनच तो उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत जाहीर केला असा टोलाही त्यांनी लगावला. सेनेनंच टँकर माफियांचं दुकान थाटलं -संजय निरुपम तर दुसरीकडे शिवसेनेच्या वचननाम्यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी जोरदार टीका केलीये. शिवसेना गेल्या 20 वर्षांत मुंबईकरांना पिण्याचं पाणी देऊ शकली नाही. शिवसेना पाणी रस्ते आणि आरोग्य अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोपही निरुपम यांनी केलाय. मुंबईत शिवसेनेनंच टँकर माफियांचं दुकान थाटल्याची टीका त्यांनी केलीये. रस्ते दुरुस्तीत साडे सहा हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Thane, काँग्रेस, जितेंद्र आव्हाड, ठाणे, राष्ट्रवादी, शिवसेना

पुढील बातम्या