06 सप्टेंबर
पाकिस्तानी कलाकारांना कार्यक्रमात सहभागी केलं तर 'खळ्ळ फट्याक' च्या भाषेत धडा शिकवू असा इशारा देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता एक पाऊल मागे घेतले आहे. कलर्स वाहिनीवरील 'सुरक्षेत्र' या कार्यक्रमाला मनसेने हिरवा कंदील दिला आहे. आज सूरक्षेत्र या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवास्थानी कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. राज यांच्याशी चर्चा केल्यानंतर बोनी कपूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्हाला लोकांच्या भावनांचा आदर आहे. यापुढे असा कोणताही कार्यक्रम करण्याअगोदर याचा विचारकरुनच पुढचे पाऊल उचलू अशी ग्वाही कपूर यांनी दिली. यापुढे अशा कोणत्याही कार्यक्रमात पाकिस्तानी कलाकारांना बोलवले जाणार नाही अशी ग्वाही कपूर यांनी दिल्यानंतर मनसेनं त्यांना परवानगी दिली आहे अशी माहिती मनसे चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.