05 मे : सुप्रीम कोर्टाने कॅम्पाकोलाच्या रहिवाश्यांना झटका दिला असून 31 मे पर्यंत घरं रिकामी करण्याचे आदेशावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. यासंदर्भात आणखी मुदतवाढ दिली जावी, अशी याचिका इथल्या नागरीकांनी केली होती. ती आज सुप्रिम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
आता 31 मेनंतर या इमारतीवर कारवाई करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे शेकडो रहिवाशांवर बेघर होण्याची नामूष्की ओढावणार आहे.
मुंबईतील वरळी येथे कॅम्पा कोला ही इमारत असून या इमारतीतील काही मजले बेकायदेशीररित्या बांधण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी या अनधिकृत मजल्यांवर महापालिकेतर्फे हातोडा मारण्यात येणार होता. मात्र या प्रकरणाची दखल घेत सुप्रीम कोर्टाने बांधकाम पाडण्यास 31 मेपर्यँत स्थगिती दिली होती.
या प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. रहिवाशांनी घर खाली करण्यास 31 मेनंतर मूदतवाढ द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली. सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ देण्यास नकार देत कोर्टाची उन्हाळी सुट्टी संपल्यावर पुढील सुनावणी होईल असे स्पष्ट केले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Campa cola, Campa cola compound, Campacola, Mumbai, Sc, Supreme court decision