02 नोव्हेंबर
फक्त काँग्रेसशासित राज्यातच नव्हे तर देशभरात 6 ऐवजी 9 सिलिंडरवर सबसिडी देण्याची मागणी काँग्रेसनं केंद्र सरकारकडे केली आहे. सरकार या मागणीवर विचार करतंय अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान गॅस सिलेंडरच्या किंमती ऑईल कंपनी नाहीतर सरकार ठरवणार असल्याचं पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी स्पष्ट केलंय. यानंतर सरकार सिलिंडरच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणार आहे. तसेच विनाअनुदानित सातव्या सिलेंडरची किंमत 26 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय केंद्रानं तूर्तास तरी स्थगित केला आहे. 7 व्या सिलेंडरसाठी 26 रुपये दरवाढ करण्याचा सरकारचा प्रस्ताव होता. त्यामुळे सातव्या सिलिंडरपासून प्रत्येक सिलिंडरसाठी 922 रुपये मोजावे लागणार होते. पण दरवाढीचा हा निर्णय सध्या स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळतेय. सप्टेंबर महिन्यात वर्षातून फक्त 6 सिलेंडरवर अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.