मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सालेमवर हल्ल्या प्रकरणी 4 कर्मचारी निलंबित

सालेमवर हल्ल्या प्रकरणी 4 कर्मचारी निलंबित

taloja jail28 जून : गँगस्टर अबू सालेमवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना निलंबित करण्यात आलंय. संजय साबळे या पोलीस अधिकार्‍याला तर चंद्रकांत पठारे नितीन सावंत,गीतेश रणदिवे या तीन कॉन्स्टेबल्सला निलंबित करण्यात आलंय. तुरुंग महासंचालक मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊनही माहिती दिली.

तुरूंगाच्या गेटवर निष्काळजीपणे ड्युटी करण्याचा ठपका ठेवत मीरा बोरवणकर यांनी आपल्या अधिकाराअंतर्गत ही कारवाई केली. दरम्यान, सालेमवर हल्ला करण्यासाठी छोटा शकीलनं सुपारी दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. छोटा शकील हा दाऊद गँगचा सदस्य आहे. एका महिन्यापूर्वी तुरुंगात रिव्हॉल्वर नेण्यात आलं होतं अशी माहिती मिळतीयं. गुरूवारी झालेल्या हल्ल्यात देवेंद्र जगताप ऊर्फ जेडीनं दोन राउंड फायर केले अशी माहिती सूत्रांनी दिली. जगताप पुन्हा फायरिंग करताना रिव्हॉल्वर लॉक झालं. त्यामुळे सालेम या हल्ल्यातून वाचला.

First published:

Tags: अबू सालेम, छोटा शकील

पुढील बातम्या