Home /News /news /

सांगलीत शेतकर्‍यांच्या संघर्ष यात्रेत सत्ताधारी खासदार सहभागी, मात्र विरोधकांची पाठ

सांगलीत शेतकर्‍यांच्या संघर्ष यात्रेत सत्ताधारी खासदार सहभागी, मात्र विरोधकांची पाठ

sangali yatra06 जुलै : सांगली जिल्ह्यातील 5 हजार शेतकर्‍यांची संघर्ष पदयात्रा सुरू आहे. जत तालुक्यामधल्या 42 गावातले शेतकरी या 150 किलोमीटर पदयात्रेत सहभागी झाले आहेत. पाणी द्या नाहीतर कर्नाटकमध्ये जाण्यासाठी एनओसी द्या अशी मागणी करत गेल्या 5 दिवसांपासून ही संघर्ष यात्रा निघाली आहे. आज ही यात्रा सांगलीमध्ये दाखल झाली. ही यात्रा सरकारच्याविरोधात असूनही भाजपचे खासदार आणि आमदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र, विरोधी पक्षात असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते त्यापासून दूर आहेत. वर्षानुवर्षे ऊसतोडणीसाठी मजूर मिळावेत यासाठी जत तालुका पाण्यापासून वंचित ठेवण्यात आला असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. म्हैसाळ पाणी उपसा योजनेचं पाणी मिळावं या मागणीसाठी उमदी ते सांगली अशी ही पदयात्रा सुरू आहे. पण त्यात विरोधक सहभागी झाले नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Sangali, आंदोलन, काँग्रेस, खासदार, भाजप, सांगली

पुढील बातम्या