12 मे : सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा आज शेवट झाला. ईव्हीएम मशीनमध्ये दिग्गजांचं भवितव्य बंद झालंय. 16 मे रोजी अंतिम निकाल जाहीर होणार आहे. पण देशात कुणाची सत्ता येणार ? कोण होणार पंतप्रधान ? यासाठी सर्वच एक्झीट पोल, पोस्ट पोल सर्व्हे प्रसिद्ध होत आहेत.
सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी म्हणजेच CSDS ने आयबीएन नेटवर्कसाठी पोस्ट पोल सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार केंद्रात 'मोदी सरकार' येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या सर्व्हेनुसार 543 जागांपैकी एनडीएला तब्बल 270 ते 282 जागा मिळतील. तर गेली दहा वर्ष सत्ता उपभोगणार्या यूपीए सरकारला 92 ते 102 जागा मिळतील.
पक्षनिहाय सर्व्हे पाहिला तर भाजप 230 ते 242 जागा पटकावेल आणि काँग्रेसला 72 ते 82 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. एकंदरीत 'अब की बार मोदी सरकार' यावर शिक्कामोर्तब होणार असंच चित्र आहे. इतर पक्षांनुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 25 ते 31 जागा मिळतील, अण्णा द्रमुक 22 ते 28, डावी आघाडी 14 ते 20, समाजवादी पार्टी 13 ते 17, बिजू जनता दल 12-16,वायएसआर (YSR) काँग्रेस 11 ते 15, बसप 10 ते 14, तेलंगणा राष्ट्र समिती 8 ते 12, द्रमुक + 7 ते 11 आणि आम आदमी पार्टीला 3 ते 7 जागा मिळतील.
जागांचा अंदाज एकूण जागा - 543
==============================================================================
पक्षनिहाय जागांचा अंदाज - एकूण जागा - 543
==============================================================================
मतांची अंदाजे टक्केवारी
पक्ष | 2009 | मतदानापूर्वी | मतदानानंतर |
काँग्रेस | 28.6% | 25% | 22% |
काँग्रेस+ | 4.2% | 3% | 3.5% |
भाजप | 18.8% | 35% | 34% |
भाजप+ | 7.5% | 5% | 6.5% |
बसप | 6.2% | 4% | 4.5% |
डावे | 7.6% | 4% | 4% |
सपा | 3.4% | 4% | 3.5% |
आप | ---- | 3% | 3% |
इतर | 23.7% | 17% | 19% |
==============================================================================
आघाड्यांची मतांची अंदाजे टक्केवारी
पक्ष | 2009 | मतदानापूर्वी | मतदानानंतर |
यूपीए | 32.8% | 28% | 25.5% |
एनडीए | 26.3% | 40% | 40% |
इतर | 40.9% | 32% | 34% |
==============================================================================
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: AAP, Abki bar modi sarkar, BJP Prospects, Bsp, ConnectTheDots, Elections 2014, Exit polls 2014, Lok Sabha elections 2014, Mamata Banerjee, Narendra modi, NDA, Post-poll survey, UPA, अण्णा द्रमुक, आम आदमी पार्टी, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, नरेंद्र मोदी, पोस्ट पोल सर्व्हे, बसपा, भाजप, वाराणसी, समाजवादी पार्टी