Home /News /news /

'सरकार 3'चं पोस्टर रिलीज

'सरकार 3'चं पोस्टर रिलीज

sarkar-raj-3 (2) 28 फेब्रुवारी : बहुचर्चित 'सरकार 3'चं पोस्टर नुकतंच रिलीज झालंय. दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं सोशल मीडियावर 'सरकार 3'चं लूक रिलीज केलं. 'सरकार 3'मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत मनोज वाजपेयी,जॅकी श्राॅफ,यामी गौतम,अमित साध यांच्याही भूमिका आहेत. 'काबील'मध्ये यामीनं साकारलेल्या व्यक्तिरेखेचं कौतुक झालं होतं. या सिनेमात ती आक्रमक भूमिकेत आहे. मनोज वाजपेयी सिनेमात राजकारण्याच्या भूमिकेत आहे. सरकार राज सिनेमात अभिषेक बच्चनची भूमिका होती. पण 'सरकार 3'मध्ये तो नाहीय. कारण त्याच्या व्यक्तिरेखेचा 'सरकार राज'मध्ये मृत्यू होतो. बिग बी सरकारप्रमाणे रुबाबदार व्यक्तिरेखेत याही सिनेमात आहेत. 'सरकार 3' भेटीला येतोय 7 एप्रिलला. या सिनेमाबद्दल बऱ्याच अपेक्षा आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Ram gopal varma, अमिताभ बच्चन, पोस्टर, सरकार 3

पुढील बातम्या