19 मार्च : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून सत्ताधारी सेना-भाजपातले मतभेद आणखी तीव्र झाले आहेत. शिवसेनेने रत्नागिरीतल्या अणु ऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता. हा मोर्चा निघाला आणि कार्यालायाच्या एक किलोमिटर अगोदरच पोलिसांनी या मोर्चाला रोखलंय.
या मोर्चात शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी,राजन साळवी ,उदय सामंत, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येन साखरी-नाटेमधील मच्छिमार सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवं तर हा प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जावा पण कोकणात नको अशी मागणी या वेळी शिवसेना खासदार आणि आमदारांनी केलीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.