मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सरकारची नाचक्की, चिक्कीला लागली बुरशी आणि मुंग्या !

सरकारची नाचक्की, चिक्कीला लागली बुरशी आणि मुंग्या !

pankaja munde and cm_washim cikki07 जुलै : चिक्कीच्या गुणवत्तेवरुन राज्य सरकारची नाचक्की सुरुच आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी या चिक्की पुरवठाच्या कंत्राटाचं समर्थन केल खरं. मात्र, चिक्कीच्या दर्जावर दररोज प्रश्न उपस्थित होत आहेत. आज (मंगळवारी) वाशीम इथल्या अंगणवाडी वाटण्यात आलेल्या चिक्कीत चक्क बुरशी आणि मुंग्या आढळून आल्यात. पोहो गावातल्या अंगणवाडीत हा प्रकार घडलाय.

चिक्कीच्या दर्जाची तपासणी करायला आलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि इतर महिला यांनी या अंगणवाडीला भेट दिली होती. त्यात हे उघड झालं. काही दिवसापूर्वीचं अमरावती जिल्ह्यातल्या एका अंगणवाडीत राजगीरा चिक्कीत लोखंडी रिंग सापडली होती. तर त्यापूर्वी चोपडामध्ये लोखंडी पट्टीही सापडली होती. एवढंच नाहीतर जळगाव जिल्ह्यातल्या चोपडामधल्या एका अंगणवाडीत राजगिरा चिक्कीमध्ये लोखंडी पट्टी सापडली होती. तर अहमदनगरमध्ये वाळू आणि माती मिश्रीत चिक्की सापडली. विशेष म्हणजे, ही सर्व चिक्की ही सूर्यकांता सहकारी संस्थेने वितरित केलेली आहे.

गेल्या 10 वर्षांत रेट कॉन्ट्रॅक्टने खरेदीची चौकशी

दरम्यान, रेट कॉन्ट्रॅक्टने गेल्या 10 वर्षांत केलेल्या खरेदीची चौकशी केली जाणार आहे अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात येत आहे. दहा वर्षांतील खरेदी, किती वस्तू आल्यात, किती पडून आहेत, नियमाचा भंग झालाय का या सर्वांची चौकशी समिती करणार आहे. अहवाल आल्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल. महिला आणि बालकल्याण खात्याच्या 206 कोटींच्या खरेदीवरून झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Pankaja munde, पंकजा मुंडे, वाशीम