11 सप्टेंबर : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्याची पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनही उपस्थित होता.
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी असते. त्यातच आज सचिन तेंडुलकरने सहकुटुंब दर्शन घेतलं. लालबागच्या राजाला मनोभावे प्रार्थना करुन सचिन आपल्या कुटुंबासह रवाना झाला.
सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या दर्शनाला आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसंच, सचिन..सचिनच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bappa morya re, गणपती बाप्पा, गणेशोत्सव, बाप्पा, बाप्पा मोरया रे, मुंबई, सचिन तेंडुलकर