Home /News /news /

सक्षम नेतृत्व जिथे तिथेच विजय-अशोक चव्हाण

सक्षम नेतृत्व जिथे तिथेच विजय-अशोक चव्हाण

19 मे : भाजपचे नेते नरेंद्र मोदी नावाच्या त्सुनामीच्या तडाख्यामुळे काँग्रेस अजूनही सावरली नाही. राज्यात काँग्रेसचे नेते एकमेकांवर खापरं फोडत आहे. जनतेचा कौल मान्य करुन विधानसभेला सामोरं जाऊन असा निर्धार काँग्रेसने केलाय पण काँग्रेसची राज्यात लाज राखणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पराभवाला कारणीभूत समजले जाणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या ठिकाणी नेतृत्व सक्षम राहिलं त्या ठिकाणी यश मिळालं पण ज्या ठिकाणी नेतृत्वचं कमकूवत होतं तिथे पराभव झाला अशी बोचरी टीका चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव ना घेता केली. तसंच सगळीकडे परिस्थिती सारखी आहे असं म्हणता येणार नाही याला कारणं विभिन्न असू शकता. राजकीय कारणं असता, विकासाची प्रश्न आहे ज्या ठिकाणी नेतृत्व सक्षम राहिलं त्या ठिकाणी यश थोपवण्यात यश आलं पण ज्या ठिकाणी नेतृत्व कमी पडले तिथे पराभव झाला असंही चव्हाण म्हणाले. तसंच कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान झाला पाहिजे असंही अशोक चव्हाण म्हणाले. नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Asokh chavan, Nanded, अशोक चव्हाण, काँग्रेस, पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री, सक्षम नेतृत्व जिथे तिथेच विजय

पुढील बातम्या