मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /डॉ.दाभोलकरांच्या मारेकर्‍याचं स्केच जारी

डॉ.दाभोलकरांच्या मारेकर्‍याचं स्केच जारी

    sketch20 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संशयित मारेकर्‍यांचं स्केच पुणे पोलिसांनी जारी केलं आहे. हल्लेखोरांची माहिती देणार्‍याला 10 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पुण्यातील बालंगधर्व रंगमदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार्‍या पुलावरून जात असताना बाईकवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला यात त्यांचा मृत्यू झाला.

    घटनाक्रम

    नरेंद्र दाभोलकरांनी राज्यभर फिरून अंधश्रद्धाविरोधात जनजागृती केली. त्यांच्या या कार्याचं केंद्र होतं पुणे... पुण्यातून निघणार्‍या साधना साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी ही चळवळ राबवली. दुदैर्व म्हणजे याच पुण्यात त्यांचा खून झाला.

    रोजच्या सवयीप्रमाणे मंगळवारी सकाळीही सातच्या सुमाराला डॉ.नरेंद्र दाभोलकर फिरायला निघाले. शनिवार पेठेत बालंगधर्व रंगमदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार्‍या पुलावरून ते जात होते. तेव्हा सात वाजून 20 मिनिटांच्या सुमाराला अचानक.. 25 ते 30 वर्षं वयाचे दोन तरूण काळ्या स्प्लेंडरवरून आले. त्यांनी बाईक लावली आणि दाभोलकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या दाभोलकरांच्या डोक्यात शिरल्या. आणि ते खाली कोसळले. त्याच क्षणी.. दोघंही हल्लेखोर पुन्हा बाईकवर बसून परागंदा झाले.

    हल्लेखोरांपैकी एकाच्या डोक्यावर रेनी कॅप होती तर दुसर्‍याच्या पाठीवर एक बॅग होती. तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना ही माहिती दिली. घटनास्थळापासून फक्त 25 फुटांवर.. म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर डेक्कन पोलीस स्टेशन आहे. बातमी कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि दाभोलकरांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण, त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

    First published:
    top videos

      Tags: Narendra dabholkar