Home /News /news /

संपकरी टॅक्सीचालकांची मुजोरी, मीडियाच्या गाड्यांची तोडफोड

संपकरी टॅक्सीचालकांची मुजोरी, मीडियाच्या गाड्यांची तोडफोड

taxi_uberमुंबई-21 जून : ऐन पावसात प्रवाशांना वेठीला धरून आज मुंबईत टॅक्सीचालकांनी संप पुकारलाय. मात्र, या संपाला हिंसक वळण लागले आहे. संपकरी टॅक्सीचालकांनी खासगी गाड्या तसंच ओला आणि उबेरच्या टॅक्सीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात एका गाडीच्या काचा फुटल्या तर चालकाही धक्काबुक्की करण्यात आलीये. एवढंच नाहीतर या मुजोर टॅक्सीचालकांनी वार्तांकन करण्यास गेलेल्या मीडियाच्या गाड्यांची तोडफोड केली. या मुजोर टॅक्सीचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ओला आणि उबेर टॅक्सी सेवेला कायद्याखाली आणा, आणि त्याचं भाडंही सरकारनं निश्चित करून द्यावं, या मागणीसाठी जय भगवान या टॅक्सी संघटनेनं संप पुकारलाय. या संपात स्वाभिमान संघटनेचे नितेश राणेंची स्वाभिमान टॅक्सी संघटनाही सहभाग झालीये. पण मुंबईतील सगळ्यात मोठी टॅक्सी संघटना म्हणजे टॅक्सीमेन्स युनियनने या बंदला प्रतिसाद न दिल्यान फार मोठा परिणाम झाला नाही. पण,ओला आणि उबेर टॅक्सीवर काळ्या पिवळ्या टॅक्सीना बंधनकारक असणारे नियम लागू करावेत या मागणीसाठी आज टॅक्सी बंद ठेवण्यात आली. आज जवळपास 2000 टॅक्सीचालक मालक आझाद मैदानात जमले होते.आणि त्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Mumbai, Taxi

पुढील बातम्या