मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी अबू कासीम ठार

श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी अबू कासीम ठार

  abu kasim429 ऑक्टोबर : काश्मीरमधील कुलगाममध्ये लष्कर-ए-तोयबाचा खतरनाक अतिरेकी अबू कासीम एन्काऊंटरमध्ये ठार झालाय. अबू कासीम हा उधमपूर बीएसएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ल्याचा मास्टरमाईंड होता.

  जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरपासून 40 किलोमीटर अंतरावर बांदीपोरा झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू कासीम ठार झाला. बुधवारी रात्री बीएसएफ जवानांच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला करून जंगलात पळ काढला होता. जवानांनी मोहिम राबवून अतिरेक्यांचा खात्मा केला. या चकमकीत अबू कासीम ठार झाला. उधमपूर हल्ल्यात कासीम सुत्रधार होता. या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात नावेदला जिवंत पकडण्यात आलं होतं. कासीम हा काश्मीरमध्ये सर्वात खतरनाक अतिरेकी अशी ओळख होती. कासीमने जवानांच्या ताफ्यांवर, कॅम्पवर हल्ले केले होते. एवढंच नाहीतर काश्मीरमध्ये अनेक हल्लेही घडवून आणले. गेल्या 5 वर्षांमध्ये काश्मीरमध्ये दहशत पसरवण्याचं काम कासीम करत होता. एनआईएने कासीमवर 10 लाखांचं बक्षीसही ठेवलं होतं. अलीकडेच बांदीपूरमध्ये एका पोलीस अधिकार्‍यांची हत्या करण्यात आली यामागे कासीमचा हात होता.

  ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

  [if0] Follow @ibnlokmattv[sc0]

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  First published:

  Tags: अतिरेकी, श्रीनगर