मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

शेत नांगरणीसाठी पैसे नसल्याने मुलांना जुंपले नांगराला !

शेत नांगरणीसाठी पैसे नसल्याने मुलांना जुंपले नांगराला !

जळगाव, 14 जुलै : दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकर्‍यांवर भीषण अवस्था ओढवलीये. शेत नांगरणीसाठी पैसे नसल्याने जळगावच्या एका शेतकर्‍यानं चक्क आपल्या मुलांना नांगराला जुंपत पेरणी केली. भडगाव तालुक्यातल्या पळसखेडा गावात ही घटना घडलीये. धारासिंग वंजारी असं या शेतकर्‍याचं नाव आहे. त्यांच्याकडं तीन एकर शेती आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणार्‍या धारासिंग यांच्याकडं यंदा नांगरणीसाठीही पैसे नव्हते. नाईलाज म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलांना नांगराला जुंपून पेरणी केली.jalgaon4

जळगाव दरवर्षी पडणारा दुष्काळ, नापिकी शेती त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍याकडे शेती कसण्यासाठी पैसे नसल्यामुळे आपल्याच पोटच्या मुलांना औताला जुंपून शेती कसायची वेळ शेतकर्‍यावर आली. भडगाव तालुक्यातील हे अल्पभूधार शेतकरी धारासिंग वजांरी यांच्याकडे तीन एकर शेती आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असल्यामुळे केलेला खर्च ही निघत नाही. त्यातच त्यांनी कर्ज काढून विहीर खोदली. पण पाणीच लागलं नाही. गेल्या वर्षी मुलीचं लग्न केलं. या हंगामात त्यांनी कापसाची लागवड केली पण शेती कसण्यासाठी पैसाच नसल्यामुळे त्यांना आपल्या मुलांना औताला जुंपून शेताची मशागत करावी लागली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Jalgaon, जळगाव

पुढील बातम्या