मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

शेतकर्‍यांच्या एकीचं बळ, दुष्काळावर मात करून उभारलं दूध प्रक्रिया केंद्र

शेतकर्‍यांच्या एकीचं बळ, दुष्काळावर मात करून उभारलं दूध प्रक्रिया केंद्र

मनोज जैसवाल, वाशिम 05 ऑगस्ट : वाशीम जिल्हा म्हटलं की, डोळ्यासमोर उभं राहतं ते नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आत्महत्या हे विदारक चित्र. मात्र फाळेगावच्या शेतकर्‍यांनी यावर मात केलीये. त्यांनी शेतकरी मंडळ स्थापन करून धवल क्रांती केलीय.

पावसाच्या भरवशावर या जिल्ह्यातली शेती.. शेतीच रामभरोसे मग जोडधंदा आणि बाकीच्या गोष्टी तर दूरच...पण आता मात्र चित्र बदलतंय. कारण शेतकरी या सगळ्यावर मात करत शेतीला पूरक व्यवसाय सुरू करतायत.washim_news3

वाशिम शहरापासून अवघ्या 12 किमी अंतरावर असलेलं हे फाळेगाव...शेती हा गावचा मुख्य व्यवसाय. कमी पावसामुळे शेतीचा भरवसा नाही. त्यामुळे शेतकरी नेहमीच संकटात...मात्र या गावातल्या काही शेतकर्‍यांनी एक शेतकरी मंडळ स्थापन केलं आणि या शेतकर्‍यांचं जीवन बदलून गेलं. नाबार्डच्या माध्यमातून या शेतकरी मंडळाने दूध संकलन युनिट उभं केलं. आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला.

या युनिटमध्ये 400 लिटर दूध सध्या संकलित केलं जातं. आणि त्या दुधाचं पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते. यातून शेतकर्‍यांना चांगलं उत्पन्न मिळतंय. 12 शेतकर्‍यांनी मिळून सुरू केलेल्या या गटात आता 35 शेतकरी आहेत.

शेतात नापिकी, कर्जबाजारीपण यामुळे हताश न होता शेतकर्‍यांनी नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे हे दाखवून दिलंय.

फाळेगावच्या शेतकर्‍यांनी...शेतकर्‍यांनीही दुधव्यवसाय किंवा इतर कोणत्याही शेती पूरक व्यवसायाची कास धरली तर शेतकर्‍याला नक्कीच अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Washim, वाशीम, शेतकरी