मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

शेजार्‍यांची झाडावर कोंबडी बसली म्हणून दोघांवर प्राणघातक हल्ला

शेजार्‍यांची झाडावर कोंबडी बसली म्हणून दोघांवर प्राणघातक हल्ला

कल्याण - 17  एप्रिल : दोन व्यक्तींमध्ये कोणत्या कारणामुळे वाद होईल, आणि गोष्ट हाणामारी पर्यंत जाईल, याचा काही नेम नाही. शेजार्‍याची कोंबडी झाडावर बसल्याने झाडाच्या मालकाने शेजार्‍याला आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. या घटनेत बाप-लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ÜÖ¦üÃÖ¾ÖÖêËÝÖ कल्याणच्या गौरीपाडा परिसरात राहणार्‍या शांताराम म्हात्रे यांची पाळीव कोंबडी घराजवळ असलेल्या झाडावर चढली होती. मात्र हे झाड आपलं आहे असं सांगत शांताराम म्हात्रे आणि त्यांचा शेजारी विलास म्हात्रेने दावा केला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचं रुपांत हाणामारीत झालं.

विलास म्हात्रे वडिलांना मारहाण होत असल्याचं पाहून शांताराम यांचा मुलगा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडला. मात्र त्यालाही विलास म्हात्रेने मारहाण केली. या प्रकरणी खटकपाडा पोलिस स्टेशनमध्ये विलास म्हात्रे, हेमंत म्हात्रे, कमलाकर म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोंबडी पाळणं किती महागात पडू शकते हे या घटनेवरुन समोर आलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Kalyan, कल्याण

पुढील बातम्या