24 ऑक्टोबर : शिवसेनेला बरोबर घेऊन सरकार बनवण्यास भाजप उत्सुक आहे, असं भाजपचे नेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय. पण शिवसेनेनं अटी शर्ती फार ताणून धरल्या तर सरकार चालवताना अडचणी येतील, ते टाळलं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अटींपेक्षाही त्यामागची मानसिकता त्रासदायक असते असंही तावडे यांनी बोलून दाखवलं.याबरोबरच घटकपक्षांना आश्वासन दिल्याप्रमाणे सत्तेमध्ये आणि विधीमंडळात वाटा देणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं.येत्या 27 तारखेला भाजपच्या विधीमंडळाच्या नेत्यांची निवड होऊन त्यानंतर पुढच्या दोन दिवसात मंत्रीमंडळाचा शपथविधी होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचं नावाला पसंती मिळाल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NDA, Shiv sena, Shivsena, एनडीए, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विनोद तावडे, शिवसेना