24 फेब्रुवारी : शिवसेनेत संवादाचा अभाव असल्याचे आज (मंगळवारी) पहायला मिळाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकल्याची पक्षाची भूमिका असताना शिवसेनेच्या 8 खासदारांनी हजेरी लावली आहे.
भूसंपादन विधेयकाबाबत दिल्लीत एनडीएची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीवर शिवसेनेनं बहिष्कार टाकल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती. 'एनडीएची बैठक होत असेल तर होऊ दे. त्या बैठकीला शिवसेनेचा प्रतिनिधी जाणार नाही. सध्या देशभरातून राजधानीत शेतकरी आले आहेत. त्यांचं बोलणंही सरकारने ऐकावं, अशी आमची अपेक्षा आहे. शिवसेना सरकारमध्ये असली तरी आधी आम्ही शेतकर्यांसोबत आहोत. त्यांच्या हिताशी आम्ही बांधिल आहोत. शेतकरी जर या विधेयकाला विरोध करत असतील तर त्यांच्याशी चर्चा केली गेली पाहिजे. त्यांचं म्हणणं ऐकून त्यावर सर्वसहमती मिळवली पाहिजे', अशी अपेक्षा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र, राऊत यांनी हे विधान केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच शिवसेनेच्या बहिष्कारातील हवा निघून गेली.
गजानन कीर्तिकर, विनायक राऊत, अरविंद सावंत, रवी गायकवाड, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, कृपाल तुमाने आणि श्रीरंग बारणे असे आठ खासदार शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीला हजर होते. त्यामुळे शिवसेनेत संवादाचा अभाव असल्याचं उघड झालं आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashish shelar, BJP, MNS, NDA, Shiv sena, आशिष शेलार, उद्धव ठाकरे, एनडीए, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, शिवसेना