25 जानेवारी : शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना परभणी जिल्ह्यातील वालूर येथे घडली आहे. आश्रम शाळेत तिसर्या वर्गात शिकणार्या 2 अल्पवयीन मुलींसोबत शाळेच्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. नराधम शिक्षक फरार आहे.
सेलू तालुक्यात वालूर येथ श्रीमती शांताबाई नखाते या आश्रम शाळेत शिकवणार्या 45 ते 50 वर्षांच्या मारुती कदम या नराधम शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केला. लहान मुलींचे वसतीगृह असलेल्या या आश्रमशाळेत खेळाच्या तासात त्याने या दोन मुलीना वर्गात बोलावून हा घृणास्पद प्रकार केला. हा प्रकार घडल्या नंतर घाबरलेल्या या मुलींनी शाळेच्या अधीक्षकांना झालेल्या प्रकारची माहिती दिली. आपले प्रकरण बाहेर गेले असून लोकांना समजल्याचं कळताच कदम याने शाळेतून पळ काढला.
त्या नंतर अधीक्षकांनी याप्रकाराची पोलिसांत तक्रार दिली असून पोलीस कदमचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून आपली मुलं सुरक्षित नसल्याची भावना व्यक्त होतं आहे. या प्रकरणात पोलीसही गंभीररित्या पावले उचलत असून, पोलिसांचं एक विशेष पथक आरोपी कदम याचा शोध घेत आहेत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Parbhani, Rape, School teacher