मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

शाब्बास...सुनबाई आणि जाऊबाई ; सहा जोड्याही विजयी !

शाब्बास...सुनबाई आणि जाऊबाई ; सहा जोड्याही विजयी !

navi mumbai winner23 एप्रिल : नवीमुंबई महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचा विजय झालाय. तब्बल 6 दाम्पत्य महापालिका सभागृहात जाणार आहेत. ऐरोली वॉर्ड क्रमांक 16 आणि 18 मधून शिवसेनेच्या विनया मढवी आणि एम. के. मढवी विजयी झाले आहेत. तर सानपाडा वॉर्ड क्रमांक 74 आणि 75 मधून शिवसेनेच्या कोमल वासकर आणि सोमनाथ वासकर, कोपरखैरणे वॉर्ड क्रमांक 39 आणि 40 मधून शिवसेनेच्या अनिता पाटील आणि शिवराम पाटील विजयी  आणि तुर्भेमधून वॉर्ड क्रमांक 68 आणि 73 मधून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या राधा कुलकर्णी आणि सुरेश कुलकर्णी विजय मिळवलाय.

एवढंच नाहीतर सासू-सून, जावा-जावाही सभागृहात जाणार आहे. महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच 50 टक्के आरक्षण महिलांना मिळालंय. 111 नगरसेवकांपैकी 56 हून अधिक महिला नगरसेवक सभागृहात असणार आहेत. याच सभागृहात काँग्रेसच्या भगत घराण्यातल्या एकाच घरातील तीन महिला जाणार आहेत. दोन सख्ख्या जावा आणि सून अशा तिघीही आता घरात एकत्र असतात तशाच सभागृहातही एकत्र जाणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Congress, नगरसेविका, राष्ट्रवादी

पुढील बातम्या