Home /News /news /

वैदर्भिय दोनदा का मतदान करेना, आम्हाला काय त्याचं -दानवे

वैदर्भिय दोनदा का मतदान करेना, आम्हाला काय त्याचं -दानवे

rava_Saheb_danve13 जानेवारी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत प्रत्येकाला एकदा मतदान करण्याचा अधिकार दिलाय. पण, इथं मुंबईत राहणारे विदर्भातील लोकं दोनदा मतदान करत आहे. मुंबई शिवसेनेला मतदान करताय. पुढे हीच लोकं गाड्या भरून विदर्भात जातात आणि भाजपला मतदान करता. आता दोनदा का मतदान करेना. करू द्या मतदान आम्हाला काय करायचं त्याचं असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं.

डोंबिवलीमध्ये मराठा विदर्भ सेवा संस्थेच्या कार्यक्रम पार पडला. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाषणात बोलण्याच्या आवेशात जीभ घसरली. आणि त्यांनी मुंबईत राहणारे वैदर्भिय दोन वेळा मतदान करत असल्याचं वक्तव्य केलंय. मुंबईत राहणारी विदर्भातली लोकं मुंबईत सेनेला एक मत देतात आणि विदर्भात जाऊन भाजपला एक मत देतात असं दानवे म्हणाले.

मात्र त्यांची ही चुक त्यांच्या लगेच लक्षात आली. आणि त्यांनी सारवासारवी करायचा प्रयत्न केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेत प्रत्येकाला एकदाच मतदान करण्याचा अधिकार दिलाय. पण, विदर्भातून मुंबईत स्थायी झालेली लोकं इथं मतदानाचा हक्क बजावता. आणि विदर्भातही त्यांची नावं मतदान यादीत आहे. कदाचित तिथेही ती मतदान करत असतील.

लोकांनी एकाच ठिकाणी मतदान करावं. समजदाराला इशारा पुरे असतो. पण, मी काही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोललो नाही अशी सारवासारवही दानवेंनी केली. एवढंच नाहीतर पत्रकारांनी तुम्ही दोनदा मतदान करा आम्हाला काही फरक पडत नाही असं बोलला होता असं विचारले असता 'तुम्ही काहीही म्हणा' असं उत्तरही दानवेंनी दिलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: BJP, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मतदान, रावसाहेब दानवे, विदर्भ

पुढील बातम्या