मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

विलासराव देशमुख यांचं निधन

विलासराव देशमुख यांचं निधन

14 ऑगस्टमाजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं चेन्नईमधल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आज दुपारी निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. यकृत आणि मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असलेल्यामुळे विलासरावांवर चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण दुपारी 1 वाजून 40 मिनटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. विलासरावांच्या पार्थिवावर उद्या लातूरमधल्या त्यांच्या जन्मगावी बाभळगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा राज्य सरकारने घोषित केला आहे. वर्षभरापुर्वी यकृत आणि मूत्रपिंडाचा विकार झाल्याचे निक्षपण झाले होते. मुंबईत उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र एक वर्ष उलटत नाही तोच आजार पुन्हा बळावला. दहा दिवसांपुर्वी मुंबईतील ब्रीच कँण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधार होत नसल्यामुळे त्यांना चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवण्यात आलं होतं. गेली 15 दिवस विलासरावांवर उपचार सुरु होते. दोन दिवसांपुर्वी त्यांची प्रकृती स्थिर झाली होती आज त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार होती. डॉक्टरांनी विलासराव देशमुखांसाठी योग्य यकृत मिळवण्यासाठी गेले 4 दिवस खूप प्रयत्न केले. 14 ऑगस्टच्या सकाळपासून विलासरावांची प्रकृती अधिकाअधिक ढासळत गेली आणि त्यांना 100 टक्के कृत्रिम श्वासोच्छ्वासाची गरज लागली. डॉक्टरांनी विलासरावांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण हृदय विकाराच्या झटक्याने दुपारी 1.40 वाजता त्यांचा मृत्यू झाला. विलासराव यांच्या निधनामुळे राज्याचे खंबीर नेतृत्व हरवल्याची भावना व्यक्त होतं आहे. विलासरावांची निधनाची बातमी कळताचा सर्वांना एकच धक्का बसला. पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसअध्यक्ष सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींसह सर्वच राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलंय. विलासरावांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असं सोनिया गांधींनी म्हटलंय. तर विलासराव एक कुशल प्रशासक होते, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली आहे. विलासरावांच्या निधनाची बातमी येताच लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाजही तहकूब करण्यात आलंय. तर राष्ट्रपती भवनात स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी आयोजित चहापानाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. विलासराव दगडोजीराव देशमुख यांची कारकिर्दबाभळगावसारख्या लहान खेड्याचा सरपंच ते केंद्रीय मंत्री व्हाया राज्याचा आठ वर्ष मुख्यमंत्री, अशी दिमाखदार राजकीय कारकिर्द घडवणारे नेते म्हणून विलासराव देशमुख परिचित आहेत. वसंतराव नाईक यांच्यानंतर राज्याचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेला हरहुन्नरी चेहरा म्हणजे विलासराव देशमुख. आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाच्या बळावर विलासराव 1999 मध्ये सर्वसंमतीने काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2009 च्या निवडणुकांमध्ये पुन्हा आघाडीची सत्ता आल्यावर दुसर्‍यांदा विलासराव देशमुखांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतरची 'हॉटेल ताज' वारी त्यांना भोवली. त्यात त्यांना आपलं मुख्यमंत्री सोडावं लागलं. पण आधी राज्यसभेवर आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात विलासरावांनी वर्णी लावून घेत दमदार कमबॅक केलं. जन्म- 26 मे 1945ठिकाण- बाभळगाव (लातूर)शिक्षण- बी. एस्सी., बी. ए. एलएलबी(गरवारे महाविद्यालय आणि आयएलएस विधी महाविद्यालयात शिक्षण)राजकीय कारकिर्द- बाभुळगावचा सरपंच ते केंद्रीय मंत्री व्हाया मुख्यमंत्री1972 - काँग्रेस कार्यकर्ता म्हणून कारकिर्दीला सुरुवात1974 ते 1976 - बाभळगावचे सरपंच1975 ते 1978 - उस्मानबाद जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष1976 - लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक1976 ते 1979 - लातूर पंचायत समितीचे सदस्य1979 - उस्मानाबाद जिल्हा बँक आणि राज्य सहकारी बँकेवर संचालक1980 - लातूरचे आमदार म्हणून निवड1982 ते 1985 - ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून निवड , त्यानंतर त्यांनी गृह, सामान्य प्रशासन, कृषी, परिवहन, शिक्षण, तंत्र-शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम1986 ते 1995 - कॅबिनेट मंत्री म्हणून ग्रामविकास, कृषी, सहकार, दुग्ध-विकास आणि पशसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शिक्षण, तंत्र व उच्च शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, परिवहन, संसदीय कामकाज, सांस्कृतिक कार्य आदी खाती सांभाळली1995- विधानसभा निवडणुकीत पराभूत(35 हजार मतांच्या फरकानं पराभूत)1995-1999 - राजकीय विजनवासात1999- पुन्हा विधानसभेवर निवड(91 हजार मतांच्या फरकानं दणदणीत विजय)18 ऑक्टोबर 1999- मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदा वर्णी18 जानेवारी 2003- मुख्यमंत्री पदावरून पायउतार11 नोव्हेंबर 2004- दुसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान7 डिसेंबर 2008- मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पद सोडावे लागले)ऑगस्ट 2009- राज्यसभेवर निवडमे 2009 ते जानेवारी 2011- केंद्रीय अवजड उद्योगमंत्रीजानेवारी 2011 ते जुलै 2011- केंद्रीय ग्रामविकासमंत्रीजुलै 2011 पासून - केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्रीराजकारणाबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये विलासरावांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांनी व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आणि क्रिकेटची आवड जपली. विशेष म्हणजे आपलं राजकीय कौशल्य वापरत त्यांनी मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. समाजकारणातही विलासरावांनी भरीव योगदान केले. मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या अनेक संस्थांची उभारणी केली.

पुढे वाचा ...

14 ऑगस्ट

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं चेन्नईमधल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आज दुपारी निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. यकृत आणि मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असलेल्यामुळे विलासरावांवर चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण दुपारी 1 वाजून 40 मिनटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. विलासरावांच्या पार्थिवावर उद्या लातूरमधल्या त्यांच्या जन्मगावी बाभळगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा राज्य सरकारने घोषित केला आहे.

वर्षभरापुर्वी यकृत आणि मूत्रपिंडाचा विकार झाल्याचे निक्षपण झाले होते. मुंबईत उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र एक वर्ष उलटत नाही तोच आजार पुन्हा बळावला. दहा दिवसांपुर्वी मुंबईतील ब्रीच कँण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधार होत नसल्यामुळे त्यांना चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवण्यात आलं होतं. गेली 15 दिवस विलासरावांवर उपचार सुरु होते. दोन दिवसांपुर्वी त्यांची प्रकृती स्थिर झाली होती आज त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार होती. डॉक्टरांनी विलासराव देशमुखांसाठी योग्य यकृत मिळवण्यासाठी गेले 4 दिवस खूप प्रयत्न केले. 14 ऑगस्टच्या सकाळपासून विलासरावांची प्रकृती अधिकाअधिक ढासळत गेली आणि त्यांना 100 टक्के कृत्रिम श्वासोच्छ्वासाची गरज लागली. डॉक्टरांनी विलासरावांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण हृदय विकाराच्या झटक्याने दुपारी 1.40 वाजता त्यांचा मृत्यू झाला. विलासराव यांच्या निधनामुळे राज्याचे खंबीर नेतृत्व हरवल्याची भावना व्यक्त होतं आहे.

विलासरावांची निधनाची बातमी कळताचा सर्वांना एकच धक्का बसला. पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसअध्यक्ष सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींसह सर्वच राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलंय. विलासरावांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असं सोनिया गांधींनी म्हटलंय. तर विलासराव एक कुशल प्रशासक होते, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली आहे. विलासरावांच्या निधनाची बातमी येताच लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाजही तहकूब करण्यात आलंय. तर राष्ट्रपती भवनात स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी आयोजित चहापानाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

विलासराव दगडोजीराव देशमुख यांची कारकिर्द

बाभळगावसारख्या लहान खेड्याचा सरपंच ते केंद्रीय मंत्री व्हाया राज्याचा आठ वर्ष मुख्यमंत्री, अशी दिमाखदार राजकीय कारकिर्द घडवणारे नेते म्हणून विलासराव देशमुख परिचित आहेत. वसंतराव नाईक यांच्यानंतर राज्याचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेला हरहुन्नरी चेहरा म्हणजे विलासराव देशमुख. आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाच्या बळावर विलासराव 1999 मध्ये सर्वसंमतीने काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2009 च्या निवडणुकांमध्ये पुन्हा आघाडीची सत्ता आल्यावर दुसर्‍यांदा विलासराव देशमुखांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतरची 'हॉटेल ताज' वारी त्यांना भोवली. त्यात त्यांना आपलं मुख्यमंत्री सोडावं लागलं. पण आधी राज्यसभेवर आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात विलासरावांनी वर्णी लावून घेत दमदार कमबॅक केलं.

जन्म- 26 मे 1945ठिकाण- बाभळगाव (लातूर)शिक्षण- बी. एस्सी., बी. ए. एलएलबी(गरवारे महाविद्यालय आणि आयएलएस विधी महाविद्यालयात शिक्षण)राजकीय कारकिर्द- बाभुळगावचा सरपंच ते केंद्रीय मंत्री व्हाया मुख्यमंत्री1972 - काँग्रेस कार्यकर्ता म्हणून कारकिर्दीला सुरुवात1974 ते 1976 - बाभळगावचे सरपंच1975 ते 1978 - उस्मानबाद जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष1976 - लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक1976 ते 1979 - लातूर पंचायत समितीचे सदस्य1979 - उस्मानाबाद जिल्हा बँक आणि राज्य सहकारी बँकेवर संचालक1980 - लातूरचे आमदार म्हणून निवड1982 ते 1985 - ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून निवड , त्यानंतर त्यांनी गृह, सामान्य प्रशासन, कृषी, परिवहन, शिक्षण, तंत्र-शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम

1986 ते 1995 - कॅबिनेट मंत्री म्हणून ग्रामविकास, कृषी, सहकार, दुग्ध-विकास आणि पशसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शिक्षण, तंत्र व उच्च शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, परिवहन, संसदीय कामकाज, सांस्कृतिक कार्य आदी खाती सांभाळली

1995- विधानसभा निवडणुकीत पराभूत(35 हजार मतांच्या फरकानं पराभूत)1995-1999 - राजकीय विजनवासात

1999- पुन्हा विधानसभेवर निवड

(91 हजार मतांच्या फरकानं दणदणीत विजय)18 ऑक्टोबर 1999- मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदा वर्णी

18 जानेवारी 2003- मुख्यमंत्री पदावरून पायउतार

11 नोव्हेंबर 2004- दुसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान

7 डिसेंबर 2008- मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पद सोडावे लागले)ऑगस्ट 2009- राज्यसभेवर निवड

मे 2009 ते जानेवारी 2011- केंद्रीय अवजड उद्योगमंत्री

जानेवारी 2011 ते जुलै 2011- केंद्रीय ग्रामविकासमंत्री

जुलै 2011 पासून - केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री

राजकारणाबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये विलासरावांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांनी व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आणि क्रिकेटची आवड जपली. विशेष म्हणजे आपलं राजकीय कौशल्य वापरत त्यांनी मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. समाजकारणातही विलासरावांनी भरीव योगदान केले. मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या अनेक संस्थांची उभारणी केली.

First published: