मुंबई - 31 मे : विधान परिषदेचा आखाडा आता चांगलाच तापलाय. भाजपने 6 उमेदवार दिल्याने विधान परिषद निवडणुकीतली चुरस वाढलीये. पाचव्या आणि सहाव्या जागेसाठी आर.एन. सिंह आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर कऱण्यात आलीये.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपच्या विधनपरिषदेसाठी 6 आणि राज्यसभेसाठी 2 उमेदवार अर्ज भरण्यासाठी विधनभवनात दाखल झाले आहे. विधान परिषदेसाठी भाजपने सहाच्या सहा जागी उमेदवार अर्ज दाखल केले आहे. सोमवारी भाजपतर्फे पाच नावांची घोषणा करण्यात आली. भाजपने मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटनेला संधी दिलीये. सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांना उमेदवारी दिलीये. तसंच मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेले प्रवीण दरेकर यांनाही संधी देण्यात आलीये. त्याचबरोबर सुजितसिंह ठाकूर तर आज अखेरच्या वेळी आर. एन. सिंह आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, प्रवीण दरेकर, भाजप, विनायक मेटे