मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

विदर्भ-मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट,55 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

विदर्भ-मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट,55 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

vidharbha rain4404 सप्टेंबर : दुष्काळाच्या झळातून महाराष्ट्र बाहेर पडला असला तरी हे संकट पूर्णपणे अजूनही टळलेलं नाही. विदर्भात अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाचा शेतकर्‍यांना सामना करावा लागत आहे तर मराठवाडा अजूनही कोरड्या दुष्काळाशी झुंज देत आहे.

मुख्यमंत्र्यांनीही अतिवृष्टीग्रस्तांसाठी दोन हजार कोटी रुपयाची मदत जाहीर केली होती. पण सरकारी मदत वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग पत्कारलाय. आतापर्यंत विदर्भात ओल्या दुष्काळामुळे 55 शेतकर्‍यांनी आत्महत्या केलीय.

सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेली मदत अपुरी असल्याचा त्यांचा आरोप आहे. मराठवाड्याला कोरड्या दुष्काळाचा जोरदार फटका बसलाय विेशषतः मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आले. त्यांच्यासाठी राज्य सरकारनं निधी जाहीर केला. मात्र त्यांना तो अजूनही मिळालेला नाही.

यवतमाळमध्ये 55 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 55 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ही माहिती दिलीये. यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची संख्या 142 इतकी आहे. जिल्हाधिकार्‍यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या घरी भेट द्यावी असे सरकारचे आदेश आहेत. तरी अजून एकाही शेतकर्‍याच्या घराला जिल्हाधिकार्‍याने भेट दिलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांना निलंबित करण्यात यावे, तसंच शेतकर्‍यांना देण्यात आलेली मदत अपुरी असून, ती वाढवून देण्यात यावी अशी मागणी तिवारी यांनी केलीये. मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या नुकसानीसाठी दोन हजार कोटी रुपयाची मदत जाहीर केली आहे. पण 20 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍याना वाचवण्यासाठी सरकारने मदत वाढवण्याची मागणीही त्यांनी केलीये.

चंद्रपुरात पिकं भुईसपाट, बळीराजा हवालदिल

चंद्रपूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी आणि पूरानं थैमान घातलंय. 2 लाख 16 हजार शेतीवरचं पीक नष्ट झाल्यानं शेतकर्‍यांना पन्नास कोटीचा फटका बसलाय. हजारो लोकांची घरं पाण्याखाली गेली. शेती आणि पडलेल्या घरांचं अजूनही प्रशासकीय यंत्रणेनं सर्व्हेक्षण केलेलं नाही. जिल्ह्यात 2 हजार हेक्टर पेक्षा जास्त जमिनीची धूप झालीये. सरकारी मदत अपुरी असल्यानं बळीराजा हवालदिल झालाय.

केंद्राचा निधी मिळाला पण राज्य सरकारची टाळाटाळ

मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकर्‍यांना राज्य सरकारनं जाहीर केलेला निधी अद्याप दिला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर अडचण निर्माण झालीय. मोसंबी उत्पादक शेतकर्‍यांना दुष्काळात पीक जगवण्यासाठी 60 हजार रुपये जाहीर केले होते. या निधीमध्ये केंद्र सरक ारचे 30 हजार रुपये...राज्य सरकारचे 15 हजार आणि शेतकर्‍याचे 15 हजार अशी तरतूद करण्यात आली होती. यापैकी केंद्र सरकारचे 30 हजार रुपये शेतकर्‍यांना मिळालेत. मात्र राज्य सरकारचे ठरलेले 15 हजार रुपये शेतकर्‍यांना देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करतंय. राज्य सरकारच्या निधी बद्दल शासकीय पातळीवरून शेतकर्‍यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत.

First published:

Tags: अतिवृष्टी, दुष्काळ, मराठवाडा, विदर्भ