मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'विदर्भाच्या लढ्याचं नेतृत्त्व प्रकाश आमटेंकडे द्या'

'विदर्भाच्या लढ्याचं नेतृत्त्व प्रकाश आमटेंकडे द्या'

prakash amte01 ऑगस्ट : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय लढा उभारावा, आणि त्याची सूत्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांच्याकडे द्यावी अशी मागणी चंद्रपूरचे काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली आहे. वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणीही नरेश पुगलिया यांनी सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. वेगळ्या विदर्भाच्या विकासासाठी विदर्भ राज्य निर्मिती हाच पर्याय असून काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावून त्यात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी नरेश पुगलिया यांनी चंद्रपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

First published:

Tags: Prakash amte, Vidharbha, तेलंगणा, प्रकाश आमटे, विदर्भ संयुक्त कृती समिती, स्वतंत्र विदर्भ