मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

विठ्ठलाच्या दारी वृद्ध महिलेचा मृत्यू, पण मदतीला कुणीही आलं नाही !

विठ्ठलाच्या दारी वृद्ध महिलेचा मृत्यू, पण मदतीला कुणीही आलं नाही !

download27 जून- पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एका 60 वर्षांच्या वृद्ध महिलेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडली आहे.जेव्हा ही महिला बेशुद्ध पडली त्यावेळी त्या महिलेच्या मदतीला मंदिर समितीचे कर्मचारी, पोलीस, वारकरी यापैकी कुणीही आलं नाही. त्यामुळं विठ्ठलाच्या मंदिरातच माणुसकी आटल्याचं चित्र पाहायला मिळालं. आज सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. विठ्ठलाचं मुखदर्शन घेऊन रूक्मिणीच्या दर्शनासाठी बाहेर पडत असताना राजूबाई बेशुद्ध पडल्या. पत्नी खाली कोसळल्याचं पाहून त्यांच्या पतीनं मदतीसाठी सगळ्यांकडे याचना केली, पण कुणीच फारसा प्रतिसाद दिला नाही. बराचवेळ आटापिटा केल्यानंतर रूग्णवाहिका आली. त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेलं असता तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मंदिर समितीकडे स्वतःची रूग्णवाहिका नसल्यानं भाविकावर ही वेळ आलीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Pandharpur, पंढरपूर, महिला

पुढील बातम्या