मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'विकास आराखडा मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा प्लॅन'

'विकास आराखडा मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा प्लॅन'

raj34509 मार्च : आरे कॉलनीत झाडे का तोडली जात आहे ?, मेट्रो प्रकल्पासाठी नेहमी गरिबांच्या झोपडपट्‌ट्याच का दिसतात ?, मुंबईचा विकास आराखडा हा मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा प्लॅन आहे असा सणसणीत आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. तसंच गिरगाव आणि आरे कॉलनीमधील प्रस्तावित मेट्रो प्रकल्प होऊ देणार नाही असा थेट इशाराही राज ठाकरे यांनी दिलाय.

लोकसभा आणि विधानसभा पराभवानंतर मनसेनं आज आपला नववा वर्धापनदिन साजरा केला. मुंबईत ष्णमुखानंद हॉलमध्ये मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थिती वर्धापनदिन सोहळा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी मुद्दा अजेंड्यावर घेतलाय. मराठी दिन फक्त मनसेनंच साजरा केला असा दावा करत राज यांनी पुन्हा एकदा मराठीचा सूर आवळला. आज मुंबईत मराठी माणसाला हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू आहे. मध्य मुंबईत मराठी माणसासाठी आता जागा राहिली नसून मुंबईच्या बाहेर नालासोपार, विरार सारख्या भागात मुंबईकरांना ढकलले जात आहे. बिल्डर लॉबीने भूखंड अगोदरच ताब्यात घेतले आहे. जरी मराठी माणसानी घरं घेण्याचा प्रयत्न केला तर नॉनव्हेज असल्याचा ठपका ठेवून घरं नाकारली जात आहे. अगोदर या लोकांनी मुंबईतील मतदारसंघ ताब्यात घेतले. इथं यांचे नगरसेवक, आमदार आणि मग खासदार निवडून आले. पूर्वी इंच इंच लढू अशी म्हण होती पण आता इंच इंच विकू अशी मुंबईची अवस्था झालीये अशी टीका राज यांनी केली.

राज्य सरकारने मुंबई विकासाचा आराखडा मांडलाय. पण हा आराखडा मराठी माणसांच्या विरोधात आहे. मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा प्लॅन रचला गेलाय. आताच जागे व्हा अन्यथा उद्या हाकलून दिलं जाईन आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल असा आरोपही राज यांनी केला. तसंच नेमकं आरे कॉलनीतील झाडं मेट्रोसाठी का तोडली जात आहे. गिरगावमधूनच का मेट्रो फिरवली जात आहे. मलबरा हील इथं का मेट्रो नेली जात नाहीये ?, हा सगळा डाव आखला जात असून आम्ही शांत बसणार नाही. आरे कॉलनी आणि गिरगावमध्ये मेट्रो प्रकल्प उभारू देणार नाही असा इशारा राज यांनी दिलाय.

तसंच यापुढे प्रत्येक वेळी माझ्या आदेशाची वाट पाहू नका असा आदेशच एका प्रकारे राज यांनी कार्यकर्त्यांना दिला. राज यांनी पुन्हा एकदा पराभवाचे शल्य बोलून दाखवले. मी पराभवाला घाबरणारा माणूस नाही. घरात निवंत बसणारा मी माणूस नाही. निवडणुका सुरूच असतात. आता या पालिकेच्या उद्या परत कुठल्या तरी निवडणुका सुरूच असतात त्यामुळे पराभव झाला तरी विजय साजरा करीन असं सांगत राज यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहान देण्याचा प्रयत्न केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: MNS, Raj thackarey, मनसे, राज ठाकरे, विकास आराखडा