Home /News /news /

लोकं पार गाजराचा हलवा खाण्याचं विसरुन गेली,अजितदादांची टोलेबाजी

लोकं पार गाजराचा हलवा खाण्याचं विसरुन गेली,अजितदादांची टोलेबाजी

15 फेब्रुवारी : निवडणुका आल्या की ही लोकं गाजर दाखवण्याचं काम करताय. अक्षरश: इतकी गाजरं दाखवली की, लोकं गाजराचा हलवा खाण्याचं विसरून गेली अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या शैलीत केली. तसंच 25 वर्ष युती सडली असं म्हणणारी सेना  इतक्या दिवस काय टाळ्या वाजवत होती का ? अशी टीकाही अजित पवारांची उद्धव ठाकरेंवर केली.ajit_pawar_pune33 निवडणुकींच्या रणधुमाळीमध्ये प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांचा फैरी एकमेकांवर सोडल्या जातायेत. पिपंरीमध्ये अजित पवारांनी शिवसेना-भाजपवर जोरदार तोंडसुख घेतलं. पंतप्रधान आणि तुम्ही कितीही उखडायची भाषा केली तरी मात्र जनता आम्हाला उखडणार नाही, नागपूरपेक्षा पिंपरीचा विकास जास्त झालाय हे आता सिद्ध झालंय. बोलताना तारतम्य बाळगा असं म्हणत पवारांनी भाजपवर निशाणा साधला. तसंच यावर न थांबता उद्धव ठाकरेंवर देखील पवारांनी टीका केली.  '25 वर्ष काय टाळ्या वाजवत होते' आम्ही कधी यांच्यासोबत सडलो अशी भाषा वापरली नाही. पण उद्धव ठाकरे म्हणतात युतीत सडलो. आणि हे कळायला 25 वर्ष लागली. अहो 25 वर्ष म्हणजे अर्ध आयुष्य जातं. आपण 25 वर्षांनी सुरुवात केली आणि पन्नाशी गाठली तर पोरगं 25 वर्षांचं होतं. आणि 25 वर्ष यांची हयात गेली सडण्यात. काय काम करणार हे लोकं मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे. आणि हेच भ्रष्टाचाराचे आरोप करताय. इतक्या दिवस काय टाळ्या वाजवल्या का ? अजित पवारांची उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'गाजराचा पार हलवा करून टाकला' निवडणुका आल्या की ही लोकं गाजर दाखवण्याचं काम करताय. अक्षरश: इतकी गाजरं दाखवली की, लोकं गाजराचा हलवा खाण्याचं विसरून गेली. आता कुणाच्या घरी जेवायला गेलं की, जेवायला काय तर म्हणे 'गाजर का हलवा'...आता त्या गाजराचा एवढा बट्याबोळ शिवसेना आणि भाजपने केलाय अशी टोलेबाजीही पवारांनी केली. 'त्यांनी देव पाण्यात ठेवले' सरकार पडलं तर आमचं काय होणार, या काळजीत मला सोडून गेलेले भाऊ, भाई, दादा देव पाण्यात ठेऊन बसले आहे. आता आमचं काय होणार असा प्रश्न त्यांना पडलाय असा टोलाही  अजित पवारांची लक्ष्मण जगताप,आझम पानसरे ,महेश लांडगे या बंडखोरांना लगावला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: NCP, Pune, Pune election, Shiv sena, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, पुणे, भाजप, शिवसेना

पुढील बातम्या