16 ऑक्टोबर : जिथे लालू यादव असतात तिथे काही ना काही ड्रामा होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आज बिहारमध्ये निवडणुक प्रचारादरम्यान या राजद प्रमुखांवर चक्क पंखाच पडला. सुदैवाने या अपघातातून लालू प्रसाद यादव थोडक्यात बचावले.
पण काही क्षण व्यासपीठावरच्या सार्यांच्या काळजात धस्स झालं. मोतीहारी इथल्या सभेत हा प्रकार घडला. लालू चहा पित होते त्यांच्या हातावर पंखा कोसळल्यामुळे त्यांचा हात पोळला. या घटनेनंतर लालूंनी आयोजकांना चांगलंच फैलावर घेतलं. थोड्यावेळानंतर पुन्हा एकदा सभा सुरू झाली. लालूंनी नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईलमध्ये भाजप सरकार टीका केली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
[if1] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.