मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /लालूंची जेलमधून सुटका

लालूंची जेलमधून सुटका

  lalu out of jail16 डिसेंबर : चारा घोटाळ्यातील आरोपी आणि राष्ट्रीय जनता दल अध्यक्ष लालूप्रसाद यादव जेलमधून बाहेर आले आहे. त्यांची रांचीच्या जेलमधून सुटका करण्यात आली आहे. चारा घोटाळा प्रकरणी त्यांना लालूंना पाच वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.

  मागील आठवड्यात शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने लालूंना दिलासा देत जामीन मंजूर केला होता. 1996 मध्ये बिहार येथे हा घोटाळा उघडकीस आला होता. लालूप्रसाद यांच्यावर सरकारी तिजोरीतून 37.7 काटी रुपये बेकायदेशीरपणे काढल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी लालूप्रसाद यांच्या सोबत आणखीन 44 जणांना सीबीआयच्या विशेष कोर्टाने 3 ऑक्टोबरला पाच वर्षांच्या कोठडीची शिक्षा सुनावली होती.

  First published:
  top videos

   Tags: Fodder scam, Laluprasad yadav, Relief to lalu, Supreme court verdict on lalu